• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 July 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विजेचा शॉक लागून गाय दगावली

by Mayuresh Patnakar
July 16, 2026
in Guhagar
118 1
1
A cow died of electric shock
232
SHARES
663
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 16: तालुक्यातील मुंढर ओळवण वाडी येथे बुधवारी (ता. 15) संध्याकाळी माळरानावर चरत असलेल्या गायीचा ११ केव्ही वीज वाहिनी लागून जागीच मृत्यू झाला. सदर घटनेनंतर महावितरणने वीजप्रवाह खंडीत केला. गुरुवारी (ता.16) तहसीलदार परिक्षित पाटील आणि महावितरणचे अधिकाऱ्यांनी संबधीत शेतकऱ्याची भेट घेतली. महावितरण, महसुल व पशु संवर्धन विभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे. A cow died of electric shock.

मुंढर ओळवण वाडी परिसरातील माळरानावर काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे गुरे चरत होती. याच दरम्यान तेथून गेलेल्या ११ केव्ही वीज वाहिनीचे संरक्षण करणारी तार (गार्ड वायर) तुटली. या तुटलेल्या संरक्षक तारेचे एक टोक वीज प्रवाहीत झालेल्या वाहीनीला चिकटले आणि तुटलेली वायर विजेचा खांब आणि त्याला आधार देणाऱ्या वायररोपला चिकटली होती. चरणाऱ्या गायीचा स्पर्श वायररोपला झाला आणि 11 के.व्ही. वीजेचा झटका गायीला बसला. या धक्क्याने गायीचा जागीच मृत्यू झाला. संध्याकाळपर्यंत गाय घरी न आल्याने शेतकरी गायीला शोधन त्या ठिकाणापर्यंत आले. तेव्हा त्यांना वीजवाहिनीची संरक्षक तार तुटलेली दिसली. ही माहिती ग्रामस्थांना समजल्यावर त्यांनी सावधनता बाळगुन जमीनीला टेस्टर लावला तेव्हा आजुबाजुच्या जमीनीतून वीज प्रवाहीत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्काळ त्यांनी ही माहिती मुंढरमधील सामाजिक कार्यकर्ते मंगेश तावडे यांना सांगितली. त्यानंतर तळवली वीज केंद्राशी संपर्क साधुन सदर भागातील वीज प्रवाह खंडीत करण्यात आला. A cow died of electric shock.

सदर घटनेचा पंचनामा महावितरण, पशु संवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. गुरूवारी सकाळी तहसीलदार परिक्षित पाटील आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबधित शेतकऱ्यांची घरी जावून भेट घेतली. त्यावेळी शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी उपस्थित गावकऱ्यांनी केली. A cow died of electric shock.

Tags: A cow died of electric shockGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share93SendTweet58
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.