गुहागर, ता. 16 : विधान परिषदेचे उपसभापती म्हणून सभागृहात शेतकरी, कष्टकरी, कामगार, गरीब आणि समाजातील प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहीर यांनी केले. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ, महाराष्ट्र इंटक आणि गिरणी कामगार संयुक्त लढा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने परेल येथील महात्मा गांधी सभागृहात आमदार तथा कामगार नेते सचिन अहीर यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. गिरणी कामगारांच्या आग्रहास्तव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Sachin Ahir felicitated by workers
सत्काराला उत्तर देताना सचिन अहीर म्हणाले की, कामगारांच्या प्रश्नांवर आजवर जसा संघर्ष केला, तसाच पुढेही अन्यायाविरुद्ध शेवटपर्यंत लढा सुरू राहील. टीका-टिप्पणीपेक्षा सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Sachin Ahir felicitated by workers
प्रास्ताविकात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी सचिन अहीर यांच्या संघर्षशील नेतृत्वाचा गौरव केला. त्यांनी कामगारांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून, त्यांच्या उपसभापतीपदी निवडीमुळे कामगार चळवळीचा सन्मान वाढल्याचे त्यांनी सांगितले. Sachin Ahir felicitated by workers
यावेळी गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे रमाकांत बने, आनंद मोरे, ॲड. बबन मोरे, राजन लाड, महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष संजय कदम, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले. Sachin Ahir felicitated by workers
कार्यक्रमाला गोविंदराव मोहिते, निवृत्ती देसाई, अण्णा शिरसेकर, सुनील बोरकर, सुनील अहीर, शिवाजी काळे, उत्तम गिते, विजय काळोखे, मिलिंद तांबडे, किशोर रहाटे, साई निकम, हेमंत गोसावी यांच्यासह अनेक कामगार नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार निवृत्ती देसाई यांनी मानले. Sachin Ahir felicitated by workers
