एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुहागर बसस्थानकात वृक्षारोपण
गुहागर, ता. 15 : भविष्यात प्रवाशांना पत्र्याच्या शेडऐवजी झाडांच्या नैसर्गिक सावलीत बसता यावे, यासाठी नियोजनपूर्वक वृक्षलागवड करावी, असे आवाहन तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले. गुहागर एसटी आगारात एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. Plant shady trees for travelers

तहसीलदार पाटील म्हणाले, वृक्षारोपण हा केवळ एकदिवसीय उपक्रम न राहता त्याचे संगोपनही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने किमान दोन झाडे दत्तक घेऊन त्यांची नियमित काळजी घ्यावी. तसेच मोकाट जनावरांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून राबविणाऱ्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. आज प्रतिकूल परिस्थितीतही एसटी महामंडळ जनतेला सातत्याने सेवा देत आहे. अनेक यशस्वी व्यक्तींच्या आयुष्यात एसटीचे मोठे योगदान असून, योग्य वेळी गंतव्यस्थानी पोहोचविण्यात एसटीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे, असेही त्यांनी सांगितले. Plant shady trees for travelers

यावेळी गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, नगराध्यक्षा नीता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, उपसभापती निलेश सुर्वे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण, स्थानक प्रमुख स्वप्निल शिंदे, लायन्स क्लबचे निखिल तांबट, संतोष वरंडे, श्यामकांत खातू, माधव ओक, नितीन बेंडल, प्रवासी संघटनेचे पराग कांबळे, मंदार कदम तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवले यांनी केले. Plant shady trees for travelers
