दोन महिला जखमी तर एक वर्षीय बालकाचा मृत्यू
गुहागर, ता. 15 : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोडकाआगर येथील पुलावर सोमवारी रात्री रिक्षाचा अपघात आला. या अपघातात धोपावे कुळेवाडी येथील दोन महिला जखमी झाल्या आहेत. तर एक वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून सदर मृत्यू हा अपघातामध्ये ही अपघातापूर्वी झाला याबाबतचा अध्याप खुलासा झालेला नाही. Rickshaw accident in Guhagar
गुहागर तालुक्यातील धोपावे कुळेवाडी येथील स्वयंम सुरेंद्र कुळे या एक वर्षीय तापाने आजारी असलेल्या बालकाला शृंगारतळी येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी सायंकाळी 6.30 वाजता नेण्यात आले होते. त्यांच्याबरोबर त्यांची आई स्वरा सुरेंद्र कुळे, शेजारी सुप्रिया सुरेश कुळे, रमिला रमेश कुळे, कविता किशोर माने या चार महिला होत्या. आपल्या गावातीलच अनमोल शिरगावकर यांच्या रिक्षाने त्या शृंगारतळी येथे एक वर्षीय बालकावर उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. बालकाची तपासणी करून तो कोणतीच हालचाल करत नाही असे सांगून त्याला गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात यावे, अशी सूचना त्या बालकाच्या आईला केली. त्यामुळे शृंगारतळी येथून गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये येत असताना मोडकाआगर येथील पुलावरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने रिक्षा उजव्या बाजूला जागेवर पलटी होऊन अपघात झाला. सदर अपघात रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला. Rickshaw accident in Guhagar
यामध्ये रमीला रमेश कुळे, कविता किशोर माने यांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान या सर्वांना गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता रुग्णालयामध्ये तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी एक वर्षीय बालक स्वयम कुळे याची तपासणी केली असता तो मयत झाल्याचे जाहीर केले. या अपघातामध्ये बालकाच्या केवळ पायाला खर्चटले होते असे तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे. यामुळे त्या एक वर्षीय बालकाचा मृत्यू अपघातामध्ये की त्या अगोदर झाला याबाबत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. Rickshaw accident in Guhagar
मात्र अपघातात कारणीभूत असलेले रिक्षा चालक अनमोल शिरगावकर यांच्यावर गुहागर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 281, 125 अ, 125 ब, मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गौरी शेटे करत आहेत. Rickshaw accident in Guhagar
