गुहागर मार्गे नवीन वीजजोडणी कार्यान्वित
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील वाकी गावातील गेल्या अनेक दशकांपासून नागरिकांना भेडसावणाऱ्या विजेच्या समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. गुहागर मार्गे नवीन विद्युत वाहिनी कार्यान्वित झाल्याने वारंवार होणारी वीजखंडिती थांबण्यास मदत झाली असून ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. Waki village’s electricity problem finally over
सुमारे ४० वर्षांपूर्वी पालपेणे मार्गे वाकी गावाला वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र सुमारे तीन किलोमीटर लांबीची ही विद्युत वाहिनी डोंगराळ व दाट जंगलातून जात असल्याने पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे व फांद्या तारेवर पडून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असे. अनेक वीजखांबही जीर्ण झाल्याने समस्या अधिक गंभीर बनली होती. Waki village’s electricity problem finally over
दाट जंगल, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि जंगली प्राण्यांचा धोका यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दुरुस्तीचे काम करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास अनेकदा विलंब होत असे. मागील वर्षी सलग पाच दिवस गाव अंधारात राहिले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी जंगलातून वाट काढून तुटलेले वीजखांब उभारण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मोलाचे सहकार्य केले होते. Waki village’s electricity problem finally over
ही समस्या कायमची दूर करण्यासाठी वाकी ग्रामस्थांनी गुहागर मार्गे नवीन विद्युत वाहिनी उभारण्याची सातत्याने मागणी केली होती. या मागणीची दखल घेत महावितरणने नवीन विद्युत वाहिनीचे काम पूर्ण करून नुकतीच ती कार्यान्वित केली. त्यामुळे जंगलातील झाडे कोसळल्याने किंवा वीजखांब पडल्याने होणाऱ्या वीजपुरवठा खंडितीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. Waki village’s electricity problem finally over
हे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुनील सूद, शृंगारतळी शाखेचे अभियंता बी. के. सोनावणे, गुहागर शाखेचे अभियंता ऋषिकेश शेटे तसेच लाईनमन मोहन लोंढे, वायरमन अंगराज साळुंखे आणि साईश घुमे यांनी विशेष परिश्रम घेतले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने वाकी ग्रामस्थांसह मुंबईस्थित वाकीकरांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले असून, या कामामुळे गावाच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. Waki village’s electricity problem finally over
