• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 July 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुडलीत दुर्मिळ वृक्षांचे वृक्षारोपण

by Manoj Bavdhankar
July 11, 2026
in Guhagar
37 0
0
Planting of rare trees in Kudali
72
SHARES
207
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील कुडली गावाचा सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि आर्थिक विकास साधण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘श्रीदेव विठ्ठल रखुमाई सांस्कृतिक मंडळ, कुडली मोडा’ (नोंदणीकृत) यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. मंडळाने ५ जुलै रोजी कुडली गावात पुरातन, दुर्मिळ आणि पर्यावरण व आरोग्यरक्षक वृक्षांच्या रोपांची लागवड करून समाजापुढे आदर्श निर्माण केला. Planting of rare trees in Kudali

दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थापन झालेल्या मंडळाचा हा पहिलाच उपक्रम असून, जमिनीची धूप रोखणे, भूगर्भजल पातळी वाढविणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि मानवी आरोग्यास पोषक वातावरण निर्माण करणे हा या वृक्षारोपणाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमांतर्गत कदंब, सुरंगी, कवठ, वड, पिंपळ, करंज, बहावा, ताम्हण, कांचन, बदाम, काशिद, बेहडा, बकुळ, जांभूळ, चिंच, कडुलिंब, अशोक आदी दुर्मिळ व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. Planting of rare trees in Kudali

या उपक्रमाला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह गावातील पुरुष मंडळ, महिला मंडळ, क्रीडा मंडळ तसेच ग्रामस्थांनी आर्थिक, वस्तूरूप आणि श्रमदानाच्या माध्यमातून उत्स्फूर्त सहकार्य केले. पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कुडली गावासह पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत असून, ग्रामविकासासाठी मंडळाच्या पुढाकाराची प्रशंसा केली जात आहे. Planting of rare trees in Kudali

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPlanting of rare trees in Kudaliटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share29SendTweet18
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.