• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 July 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा आरेकर कुटुंबीयांकडून सन्मान

by Manoj Bavdhankar
July 9, 2026
in Guhagar
133 1
0
Aarekar family honors rural hospital staff
261
SHARES
746
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 09 : गुहागर येथील कवी तथा पूजा रिसॉर्टचे मालक राजेंद्र आरेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने गुहागर ग्रामीण रुग्णालयातील उत्कृष्ट सेवेसाठी वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी तसेच इतर कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. Aarekar family honors rural hospital staff

यावेळी आरेकर यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाचे कौतुक केले. गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येक रुग्णाला आपुलकीने आणि तत्परतेने सेवा दिली जात असल्याने ग्रामीण रुग्णालयाबद्दल नागरिकांचा विश्वास वाढला आहे. रुग्णालयात उपलब्ध असलेल्या मोफत आरोग्यसेवा आणि कर्मचाऱ्यांच्या प्रेमळ वागणुकीमुळे रुग्णसंख्येतही लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. Aarekar family honors rural hospital staff

डॉक्टरांची काही पदे रिक्त असल्याने मोजक्या डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा ताण असूनही ते हसतमुखाने सेवा बजावत आहेत, ही बाब विशेष कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच उपचारानंतर घरी गेलेल्या रुग्णांचीही त्यांच्या नातेवाईकांकडून आस्थेने विचारपूस केली जाते, रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवला जातो आणि सर्व कर्मचारी सेवाभावाने कार्यरत असल्याने संपूर्ण कर्मचारीवर्ग अभिनंदनास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. भविष्यातही यापेक्षा अधिक दर्जेदार आणि रुग्णाभिमुख सेवा मिळावी, अशी अपेक्षाही राजेंद्र आरेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. Aarekar family honors rural hospital staff

Tags: Aarekar family honors rural hospital staffGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share104SendTweet65
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.