गुहागर, ता. 08 : शहरातील वरचापाट दुर्गादेवीवाडी येथे नगरसेविका सौ. स्वरा गणेश तेलगडे यांच्या पुढाकाराने एसटी महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) नोंदणीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण १०६ ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ घेत NCMC कार्डासाठी नोंदणी केली होती. Distribution of NCMC cards at Guhagar

या शिबिरातून तयार करण्यात आलेल्या NCMC कार्डांचे नुकतेच लाभार्थींना वितरण करण्यात आले. या कार्डामुळे एसटी प्रवासासह विविध डिजिटल व्यवहार अधिक सुलभ होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांना शासकीय सुविधा त्यांच्या परिसरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. Distribution of NCMC cards at Guhagar
