• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 July 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात कोयत्याने जीवघेणा हल्ला

by Mayuresh Patnakar
July 7, 2026
in Guhagar
204 2
0
Deadly attack with a sickle
401
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आरोपी अटकेत, मंगेश माटल यांची प्रकृती स्थिर

गुहागर, ता. 07 : शहरातील किर्तनवाडी येथील मंगेश माटल या तरुणावर गुहागर वरचापाट नारायणवाडी येथील संदिप गिजे यांने कोयत्याने वार केले. सुदैवाने या जीवघेण्या हल्ल्यातून मंगेश माटल वाचले. या प्रकरणी पोलीसांनी संदिप गिजे याला 6 जुलै रोजी रात्री अटक केली आहे.  वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.  Deadly attack with a sickle

गुहागर किर्तनवाडी येथील मंगेश काशिनाथ माटल (वय ४३) हे मूर्तीकार आहेत. भाद्रपदातील गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करण्याची त्यांची लगबग सुरू झाली आहे. 6 जुलै रोजी सकाळपासूनच मंगेश माटल आपत्या घरासमोरील शेडमध्ये गणपतीची मूर्ती रंगविण्याचे काम करत होते. गुहागर वरचापाट नारायणवाडी येथे रहाणारे संदीप तुकाराम गिजे (वय ४१) यांचा त्यांच्यावर संशय होता. या संशयाने चिडलेला संदीप 6 जुलै रोजी दुपारी 1.30 च्या दरम्यान हातात कोयता घेऊन मंगेश माटलच्या गणेश मूर्तीच्या शेडमध्ये आला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संदीप गीजे यांने थांब तुला मारतो असे सांगत मंगेश माटल यांच्या उजव्या गालावर,  कानामागे, डोक्यावर व उजव्या खांद्याच्या पाठीमागील भागावर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले. अचानक झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या मंगेश माटलने  आरडाओरड सुरू केली. पतीचा आवाज ऐकून पत्नी मानसी माटल धावून आली. मानसी माटल यांना पाहताच संदीप गीजे तेथून पळून गेला. त्यानंतर मानसी माटल यांनी शेजारी रहाणारे अनिल सखाराम जोशी यांच्या मदतीने मंगेशला गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अशी तक्रार फिर्यादी मंगेश माटल याने गुहागर पोलीसात दिली आहे. Deadly attack with a sickle

मंगेश माटल यांच्या जखमा गंभीर स्वरुपाच्या असल्याने ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. Deadly attack with a sickle

दरम्यान या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०९(१) अन्वये जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा गुहागर पोलिसांनी संदीप गिजे याला अटक केली आहे. पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत. Deadly attack with a sickle

Tags: Deadly attack with a sickleGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share160SendTweet100
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.