गुहागर, ता. 06 : चिपळूण येथील प्रसिद्ध मल्टीस्पेशालिटी अपरांत हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागात डॉ. ईशा दांडेकर यांनी नुकतीच फिजिओथेरपिस्ट म्हणून रुजू झाल्या आहेत. डॉ. ईशा दांडेकर यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (MUHS) मधून फिजिओथेरपीचे शिक्षण पूर्ण केले असून Neuro आणि Sports Rehabilitation या क्षेत्रात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. पॅरालिसिस, सेरेब्रल पाल्सी, ट्रॉमॅटिक ब्रेन इंज्युरी तसेच स्पाइन इंज्युरीग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याचा त्यांना उल्लेखनीय अनुभव आहे. Dr. Isha Dandekar joins Aparant Hospital

शिक्षणानंतर त्यांनी पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटल, कमला नेहरू गव्हर्नमेंट हॉस्पिटल, संजीवन हॉस्पिटल, रंका हॉस्पिटल तसेच GB School of Neurorehabilitation येथे कार्यरत राहून विशेषतः न्यूरो रिहॅबिलिटेशन क्षेत्रात समृद्ध अनुभव मिळवला आहे. Dr. Isha Dandekar joins Aparant Hospital
अपरांत हॉस्पिटल हे मेडिसिन, सर्जरी, ऑर्थोपेडिकसह विविध वैद्यकीय विभागांनी सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असून, रुग्णांना अधिक दर्जेदार व सर्वसमावेशक उपचार मिळावेत या उद्देशाने फिजिओथेरपी विभाग अधिक सक्षम करण्यात आला आहे. “फिजिओथेरपीच्या माध्यमातून रुग्णांना शक्य तितक्या लवकर स्वावलंबी बनवणे हेच माझे ध्येय आहे,” असे डॉ. ईशा दांडेकर यांनी यावेळी सांगितले. Dr. Isha Dandekar joins Aparant Hospital
अपरांत हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने डॉ. ईशा दांडेकर यांचे स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा परिसरातील रुग्णांना निश्चितच मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. Dr. Isha Dandekar joins Aparant Hospital
