• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
5 July 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रोटरी स्कूलचे 9 विद्यार्थी सी. ए. फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण

by Mayuresh Patnakar
July 5, 2026
in Ratnagiri
37 0
0
Rotary School's Success in CA Foundation Exam
73
SHARES
208
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 05 : माहे जूनमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या सी. ए. फाउंडेशन परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या 9 विद्यार्थ्यांनी सी. ए. फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण होऊन रोटरी स्कूलची यशोगाथा कायम राखली आहे. Rotary School’s Success in CA Foundation Exam

सी. ए. कोर्सच्या प्रवेश परीक्षेसाठी सी. ए. फाउंडेशन परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेकरिता संपूर्ण देशभरातून वाणिज्य शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रविष्ट होत असतात. यामध्ये रोटरी स्कूलच्या वाणिज्य शाखेतील चिराग ओडोल, श्रावणी आवटी, हित जोयसर, मानसी कापसे, स्वराज मुरुडकर, तन्वी कानडे, श्वेता लांजेकर, अमिरा चौगुले, उल्फत मुकादम या विद्यार्थ्यांनी आपल्या बुध्दीचातुर्याच्या बळावर सी. ए. फाउंडेशन परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांची रोटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच सी.ए.फाउंडेशनची तयारी सुरू झाली होती. यासाठी त्यांना वाणिज्य विभागातील प्रा. रुपाली बोडस, प्रा. बाळासाहेब राऊत, प्रा. पारस नलावडे, प्रा. स्वप्निल पंडित, प्रा. अक्सा फोपळोणकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. Rotary School’s Success in CA Foundation Exam

संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, संस्थेचे पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सी. ए. फाउंडेशन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Rotary School’s Success in CA Foundation Exam

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRotary School's Success in CA Foundation Examटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share29SendTweet18
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.