• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 July 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर जीवन शिक्षण शाळेत शिक्षण परिषद

by Mayuresh Patnakar
July 2, 2026
in Guhagar
57 0
0
Education Conference at Guhagar
112
SHARES
319
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक जीवन शिक्षण शाळा, गुहागर क्रमांक १ येथे गुहागर केंद्राची शिक्षण परिषद केंद्रप्रमुख डॉ. मनोज नरसी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी सादर केलेल्या सुमधुर परिपाठाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर कांबळे तसेच गुहागर क्र. २ शाळेचे शिक्षक जुनेद शेख यांची केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. Education Conference at Guhagar

Education Conference at Guhagar

परिषदेत विविध शैक्षणिक विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले. ‘मिशन अभय’ या विषयावर पदवीधर शिक्षक राजू सुर्वे यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या कायद्याची माहिती देत शिक्षकांची जबाबदारी आणि बालसुरक्षेचे महत्त्व स्पष्ट केले. मूल्यसंवर्धन, ‘रूम टू रीड’, ग्रंथालय व्यवस्थापन, सेतू अभ्यास, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि ‘मित्र’ उपक्रम या विषयांवरही मार्गदर्शकांनी सविस्तर माहिती दिली. Education Conference at Guhagar

मुख्याध्यापक ईश्वर वसावे यांनी परिषदेचे यशस्वी आयोजन केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. मनोज पाटील यांनी विविध शासकीय शैक्षणिक योजनांचा आढावा घेत तज्ज्ञ मार्गदर्शक व आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर हलगरे यांनी, तर आभार प्रदर्शन राजू सुर्वे यांनी केले. Education Conference at Guhagar

परिषदेला असगोली क्र. १ शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत झगडे, जीवन शिक्षण शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर वसावे, सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर कांबळे, गुहागर हायस्कूलचे शिक्षक मोहिते, ‘रूम टू रीड’ प्रकल्पाचे तालुका समन्वयक रामटेके, मूल्यवर्धन प्रशिक्षण समन्वयक विलास नरळकर, केंद्र मुख्याध्यापिका मनीषा शिंदे, ज्येष्ठ शिक्षक संजय आवटे आदी उपस्थित होते. Education Conference at Guhagar

Tags: Education Conference at GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share45SendTweet28
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.