• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 July 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

12 वर्षांनंतर विश्वास खरे खून प्रकरणाचा निकाल

by Mayuresh Patnakar
July 1, 2026
in Old News
149 1
0
Vishwas Khare Murder Case

Vishwas Khare Murder Case

292
SHARES
835
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दोन आरोपींना जन्मठेप, 12 दिवसांत सुनावणी पूर्ण

गुहागर, ता. 1 : ऑक्टोबर 2014 मध्ये खून झालेल्या विश्र्वास खरे यांच्या खटल्याचा निकाल 12 वर्षांनंतर लागला. Crime News चिपळूण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा.डी. बी. म्हालटकर चिपळूण येथे महिनाभरापूर्वीच रुजू झाले. त्यांनी १२ वर्षे प्रलंबित केसची सुनावणी 12 दिवसांत पूर्ण केली. आरोपी अमोल चंद्रकांत गाढवे व किरण रामदास कुचेकर या दोघांना जन्मठेप व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजूरी अशी शिक्षा ठोठावली.

Vishwas Khare Murder Case

गुहागर वरचापाट येथील विश्वास महादेव खरे यांचा ०१ ऑक्टोबर २०१४ रोजी खरे प्लेझर पॉईंट या होमस्टे येथे दोन पर्यटक आले होते. विश्र्वास खरे यांच्या गळ्यातील 10 तोळ्याची सोनसाखळी चोरण्याचा त्यांचा डाव होता. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी विश्र्वास खरे आपल्या होम स्टेमधील स्वयंपाकघरात काम करत असताना या दोघांनी क्रूरपणे विळा व सूरा याने विश्र्वास खरे यांचा गळा, पोट, हात यावर २१ गंभीर इजा केल्या. सोनसाखळी चोरुन तेथून पोबारा केला. दुपारी 1.00 च्या दरम्यान ही घटना घडल्याचे लक्षात आले.  Crime News

आठवणीतील-विश्र्वास-खरे_Coast-Guard
आठवणीतील विश्र्वास खरे_Coast Guard

गुहागर पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरिक्षक विनित चौधरी यांनी विश्र्वास खरे यांचा खून आणि १० तोळयाची सोनसाखळी चोरी याबद्दल दोन अज्ञान पर्यटकांवर भा.द.वि. कलम ३०२, ३९४ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. ठसे तज्ञ, श्वानपथक, सीसीटीव्ही फुटेज याद्वारे वेगाने तपास सुरू झाला परंतू म्हणावे तसे यश मिळत नव्हते. तब्बल ३ महिन्यानंतर रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व गुहागर पोलिसांना तपासात यश आले. पोलिसांनी अमोल चंद्रकांत गाढवे रा. बोपखेल पूणे,  किरण रामदास कुचेकर रा. उत्तमनगर पूणे व त्यांना माहिती पुरवणारा विष्णू किसन तनपुरे रा. दिघी, पूणे यांना जानेवारी २०१५ मध्ये अटक केली.  

Vishwas Khare Murder Case संदर्भात तपासकामासाठी या तिघांना गुहागरात आणण्यात आले होते. यापैकी एका मारेकऱ्याला गुन्हा कसा घडला हे सांगण्यासाठी गुहागर वरचापाट मध्ये फीरविण्यात आले.  त्यावेळी ह्या संशयिताने आपण महाबळेश्वर चिपळुण मार्गे गुहागरला आल्यानंतर वरचापाट येथील दुर्गादेवीच्या खांबाजवळी एका घराच्या अंगणात मोटरसायकल उभी करुन वाडीमधून विश्वास खरे यांच्या पर्यटन निवास संकुलापर्यंत गेल्याचे सांगीतले.  विश्र्वास खरे यांच्या पर्यटन संकुलातील एका खोलीत तीघेही राहीले.  सकाळी विश्वास खरे यांच्याकडे चहाची मागणी केली. त्यावेळी ह्या तीघांपैकी एक जण समुद्रावर गेला होता.  चहा पिऊन झाल्यावर त्यांनी तीघांसाठी पोहे मागविले.  विश्वास खरे हे पोहे घेऊन पर्यटन संकुलातील स्वयंपाक घरात गेले. त्याचवेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी त्यांनी द्यावी अशी मागणी केल्याचे त्या संशयिताने सांगीतले.  Vishwas Khare यांनी सोन्याची साखळी न दिल्याने झटापटीला सुरूवात झाली.  मारामारीत विश्वास खरे भारी ठरत असल्याने बाजुलाच असलेले कापड त्यांच्या डोक्याला गुंडाळून तेथीलच धारदार हत्याराने त्याला मारले.  त्यानंतर सोन साखळी घेऊन पुन्हा वाड्या वाड्यांमधून वाट काढत आपण मुख्य रस्त्याला पोचल्याचे त्या संशयिताने सांगीतले.

सुरवातील ही केस खेड सत्र न्यायालयात सुरू होती. काही काळानंतर चिपळूण सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आली. सरकारी वकील प्रफुल्ल रामचंद्र साळवी यांनी आव्हानात्मक स्थितीत परिस्थितीजन्य पूराव्यांची भक्कम बाजू उभी करणेसाठी एकूण ५१ साक्षीदार तपासले. या साक्षीदारांमध्ये विश्र्वास खरे यांचे भाऊ गोविंद खरे, विवेक खरे, पत्नी विद्या खरे, आरोपींना रस्त्यावरुन मोटारसायकलने जाताना पाहणारी शर्मिला घुमे,  सोनसाखळी खरेदीदार सोनार विरसिंह चौहान,  शव विच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.बळवंत, तहसिलदार गुहागर, ठसेतज्ञ विनोद मेश्राम यासह मोबाईल कंपन्यांचे नोडल ऑफिसर यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. केसमधील मुख्य साक्षीदार आरोपी विष्णू तनपुरे, सोनार विरसिंह चौहान व अन्य पंच व साक्षीदार हे फितूर झाले होते.  मात्र सरकारी वकील श्री. साळवी यांनी विस्तृत उलटतपास करुन सरकारपक्षाची केस भक्कम केली होती. Vishwas Khare Murder Case

आठवणीतील विश्र्वास खरे कासव मित्र
आठवणीतील विश्र्वास खरे कासव मित्र

Vishwas Khare Murder Case

या केसमध्ये आरोपी क्र. १ अमोल चंद्रकांत गाढवे व आरोपी क्र. २ किरण रामदास कुचेकर हे घटनेच्यादिवशी गुहागरात होते. खून केल्यानंतर पुणे येथे गेले. ही बाब मोबाईल टॉवर सीडीआर वरुन सिध्द झाली. तसेच गाढवे व कुचेकर यांनीच सोनाराला चैन विकली ही न्यायालयात सिध्द झाली. त्यावरुन गाढवे व कुचेकर यांनीच विश्र्वास खरे यांचा खून केला ही गोष्ट संपूर्ण घटनाक्रम व परिस्थितीजन्य पुराव्याआधारे न्यायालयात सिध्द झाली. त्याच्या आधारे मा. न्यायाधिशांनी (Chiplun Court) आरोपी अमोल चंद्रकांत गाढवे, किरण रामदास कुचेकर या दोघांना कलम ३०२ खून व कलम ३९४ चोरीसह ३४ भा.द. वि. अन्वये जन्मठेप व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजूरी अशी शिक्षा ठोठावली. Vishwas Khare Murder Case

या केसचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक गुहागर श्री. विनीत चौधरी (Guhagar Police) व स्थानिक गुन्हा अन्वेषण (LCB Ratnagiri) चे पोलिस निरीक्षक एस. एल. पाटील यांनी केला होता. तर गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सचिन सावंत यांनी साक्षीदारांना वेळेवर हजर करण्यात, कोर्टाला वेगाने केस चालविण्यासाठी सहकार्य केले. पैरवी अंमलदार म्हणून पोलिस हवालदार प्रदीप भंडारी व आशिष शिंदे यांनी काम पाहिले. तर सदर खटल्याकामी सरकारपक्षातर्फे अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले.

12 वर्षांनंतर 12 दिवसांत निकाल

चिपळूण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा. डी. बी. म्हालटकर हे चिपळूण येथे महिनाभरापूर्वीच रुजू झाले. त्यांनी 12 वर्ष प्रलंबित असलेली ही केस जलदगतीने सोडविण्याचा निर्णय घेतला. सुमारे 12 दिवसांत सदरच्या केसमध्ये दोन्ही वकिलांचा सलग युक्तिवाद त्यांनी ऐकला. आणि केस निकाली काढली.

Tags: Chiplun CourtCrime NewsGuhagarGuhagar NewsGuhagar PoliceLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarratnagiriVishwas Khare Murder Caseखून प्रकरणगुहागरचिपळूणजन्मठेपटॉप न्युजताज्या बातम्यान्यायालयमराठी बातम्यारत्नागिरीलोकल न्युजविश्वास खरे
Share117SendTweet73
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.