गुहागर, ता. 01 : ग्रामपंचायत उमराठच्या विशेष ग्रामसभेत आंतरराष्ट्रीय विधवा दिनाचे औचित्य साधून गावातील विधवा महिलांचा सन्मान करत ‘एकल महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतचे प्रशासक जनार्दन आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. ‘Single Women’s Day’ in Umrath
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले, कृषी विस्तार अधिकारी सर्जेराव कांबळे आणि विस्तार अधिकारी प्रतापसिंह जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ‘Single Women’s Day’ in Umrath

कृषी विस्तार अधिकारी सर्जेराव कांबळे यांनी पावसाळी भाजीपाला लागवड, बियाणांची निवड व निगा याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर कुणबी सेवा संघ, दापोली यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या पावसाळी भाजीपाला बियाण्यांचे शेतकरी ग्रामस्थांना वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे यांनी विशेष ग्रामसभेचा अजेंडा मांडत १६ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यावर चर्चा, ग्रामपंचायत वित्त आयोग समन्वय समितीची स्थापना, सेंद्रिय शेती व वृक्षलागवड, ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियान, ‘स्टॉप डायरिया’ आणि पीएम-अजय यासह विविध विषयांवर चर्चा घडवून आणली. ‘Single Women’s Day’ in Umrath

महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या निर्देशानुसार गावातील विधवा महिलांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सुपारीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी इंदिरा घाडे, अनिता कदम, रमिला जालगांवकर, पार्वती गावणंग, सावित्री जालगांवकर, सुनंदा गावणंग आणि सावित्री गावणंग यांना सन्मानित करण्यात आले. ‘Single Women’s Day’ in Umrath

प्रशासक जनार्दन आंबेकर यांनी सन्मानित महिलांना शुभेच्छा देताना, यापुढे गावातील सर्व विधवा महिलांचा त्यांच्या वाढदिवशीही सन्मान करण्यात येईल, अशी घोषणा केली. या विशेष ग्रामसभेला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम आणि साईस दवंडे यांनी सहकार्य केले. ‘Single Women’s Day’ in Umrath
