• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनसेचा जिल्हापरिषदेचा सदस्य चांगले काम करतोय

by Guhagar News
June 30, 2026
in Old News
81 1
0
Press conference at Shringartali
160
SHARES
456
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्याकडून प्रमोट गांधी यांचे कौतुक

गुहागर/प्रतिनिधी – रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकमेव उमेदवार प्रमोट गांधी यांच्या रुपाने जिल्हापरिषद सदस्यपदी निवडून आला, याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्याकडून चांगले काम सुरु असून त्यांना सर्वसामान्य जनतेकडून चांगले सहकार्य मिळत आहे, भविष्यातील निवडणुकीत जिल्ह्यात मनसे आपले उमेदवार उभे करुन ते निवडून येतील असा ठाम विश्वास मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केला. Press conference at Shringartali

रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेले मनसेचे नेते सरदेसाई यांच्यासह गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, उपजिल्हा अधिकारी विनोद जानवळकर याच्यासह असंख्य पदाधिकारी शृंगारतळी येथील आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित होते. देसाई यांनी जिल्हा दौऱ्याचा उद्देश सांगितला. जिल्ह्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या नेमणूका करणे, पक्षवाढीसाठी कार्यक्रम जाहीर करणे आदी विषय मांडले. सत्ताधारी पक्षाकडून इतर पक्षातले निवडून आलेले लोकप्रतिनिधी फोडले जात आहेत ते पाहता देशातले प्रादेशिक पक्ष धोक्यात आल आहेत, यावर बोलताना ते म्हणाले, प्रादेशिक पक्ष फोडणे हे धोकादायक असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून याविषयी सरकारच्या नेतृत्वावर टीकाही केली जात आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी संघाच्या केलेल्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी केलेली टीका रास्त असून मनसेने या वक्तव्यावर टीकेची झोडही उठवली आहे. मुंबईत मराठी विरुध्द अमराठी असा वाद वारंवार समोर येत असून मनसे सुरुवातीपासून यावर लक्ष ठेऊन असून स्थानिकांवरील अन्यायाविरुध्द मनसे नेहमीच आक्रमक असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. Press conference at Shringartali

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPress conference at Shringartaliटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.