• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अंजनवेल मुख्य रस्त्यावर दरड कोसळली

by Mayuresh Patnakar
June 30, 2026
in Guhagar
97 1
0
Heavy rains add to natural disaster
191
SHARES
545
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पाचेरीआगर रस्त्यावर झाड पडून वाहतूक बंद

गुहागर, ता. 30 : तालुक्यात मुसळधार पावसाने नैसर्गिक आपत्तीत भर पडताना दिसून येत आहे. अंजनवेल बौध्दवाडी मुख्य रस्त्यावर दरड कोसळली असून वेळीच उपाययोजना न केल्यास व रात्रभर पाऊस पडल्यास अधिक दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मुख्य मार्ग बंद होण्याची शक्यता तेथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. Heavy rains add to natural disaster

तसेच मौजे पाचेरीआगर काजरोळकरवाडी रस्त्यावर झाड पडून वाहतूक बंद झाली आहे. मौजे गुहागर येथील विलास बाळकृष्ण नार्वेकर यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले असून अंदाजित 35 हजार 400 रु. इतके नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी पाभरे खुर्द येथील सुरेश पांडुरंग आगरे यांच्या गोठ्यावर झाड पडून गोठ्याचे नुकसान झाले. पाभरे खुर्द येथील विजय रत्नाकर पाष्टे यांच्या घराजवळील संरक्षण भिंत कोसळली. दरम्यान, तालुक्यातील काही गावांच्या एसटी मार्गावर रस्त्यालगत झाडी वाढली असून वाहतुकीला अडथळा येत आहे. काही ठिकाणी झाडी मारलेलीच नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. Heavy rains add to natural disaster

Tags: GuhagarGuhagar NewsHeavy rains add to natural disasterLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet48
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.