गुहागर, ता. 29: गावाचा सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व आर्थिक विकास साधण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘श्रीदेव विठ्ठल रखुमाई सांस्कृतिक मंडळ, कुडली मोडा’ (नोंदणीकृत) यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मंडळाची स्थापना १४ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली असून, त्यानंतरचा पहिला उपक्रम म्हणून ५ जुलै २०२६ रोजी पुरातन, दुर्लक्षित, दुर्मिळ तसेच पर्यावरण व आरोग्यरक्षक वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे. Tree plantation at Kudali

जमिनीची धूप रोखणे, भूगर्भजल पातळी वाढविणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि मानवी आरोग्यास पूरक ठरणारे अधिक ऑक्सिजन देणारे व सावलीची निर्मिती करणारे वृक्ष वाढविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. यामध्ये कदंब, सुरंगी, कवठ, वड, पिंपळ, करंज, बहावा, ताम्हण, कांचन, बदाम, काशिद, बेहडा, बकुळ, जांभूळ, चिंच, कडुलिंब, अशोक आदी वृक्षांच्या रोपांची लागवड केली जाणार आहे. Tree plantation at Kudali
या उपक्रमासाठी मंडळाचे व्यवस्थापक मंडळ, गावातील पुरुष व महिला मंडळ तसेच क्रीडा मंडळ यांच्याकडून आर्थिक, वस्तूरूप आणि श्रमदानाच्या माध्यमातून उत्स्फूर्त सहकार्य लाभत आहे. या अभिनव पर्यावरणपूरक उपक्रमाची कुडली गावासह पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून, नागरिकांकडून त्याचे स्वागत केले जात आहे. Tree plantation at Kudali