• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर आगाराची ‘एसटी संगे तीर्थयात्रा’

by Mayuresh Patnakar
June 29, 2026
in Guhagar
84 1
0
Travelers will get pilgrimage 'package'
165
SHARES
472
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रवाश्यांना मिळणार तीर्थक्षेत्र ‘पॅकेज’ सवलतीच्या दरात

गुहागर, ता. 29 : सुरक्षित व आरामदायी प्रवासाची हमी असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या गुहागर आगारातर्फे तीर्थक्षेत्र पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. ग्रुप स्वरूपात नोंदणी करून प्रत्येक व्यक्तीला सवलतीच्या दरामध्ये होणारा तिकीट खर्च यामध्ये सादर करण्यात आला आहे. यामुळे आता जनतेला एसटी संगे तीर्थयात्रा करावयास मिळणार आहे.  Travelers will get pilgrimage ‘package’

एस. टी. महामंडळ गुहागर आगारातर्फे एक दिवसाच्या प्रवासामध्ये कोल्हापूर दर्शन करता येणार आहे यासाठी फुल तिकीट रुपये १००० तर हाफ तिकीट रुपये ५०० इतका प्रत्येकी खर्च येणार आहे. एक दिवसात आळंदी दर्शन फुल तिकीट रुपये १४०० तर हाफ तिकीट रुपये ७०० प्रत्येकी खर्च येणार आहे. एक दिवसात आदमापुर दर्शनामध्ये फुल तिकीट रुपये १००० तर हाफ तिकीट रुपये ५०० येणार आहे. दोन दिवसाच्या पॅकेज टूर्समध्ये शिर्डी, शनिशिंगणापूर आणि महाबळेश्वर दर्शन व दुसरा मार्ग अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर दर्शन या पॅकेजमध्ये प्रत्येकी फुल तिकीट रुपये २२०० तर हाफ तिकीट रुपये ११०० अशा सवलतीच्या दरामध्ये हे पॅकेज टूर्स सुरू करण्यात आले आहे. Travelers will get pilgrimage ‘package’

यामध्ये एसटीची आसनक्षमता असलेली ग्रुप पद्धतीने बुकिंग सुविधा देण्यात आली आहे. योजनेनुसार याच बुकिंग मध्ये महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक सवलतीचा लाभही देण्यात येणार आहे. याचा जनतेने लाभ उठवावा, असे आवाहन गुहागर आगाराचे स्थानक प्रमुख तथा प्रभारी आगारप्रमुख स्वप्नील शिंदे यांनी केले आहे. Travelers will get pilgrimage ‘package’

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTravelers will get pilgrimage 'package'टॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share66SendTweet41
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.