गुहागर, ता. 25 : शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी ऑनलाइन अर्ज व नामांकने मागविण्यात आली आहेत. शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा या पुरस्काराद्वारे गौरव केला जातो. Call for applications for National Teacher Award

केंद्र व राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मान्यताप्राप्त मंडळांशी संलग्न अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना मार्गदर्शक तत्त्वांनुसार अर्ज करता येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर १५ जून २०२६ ते १० जुलै २०२६ या कालावधीत अर्ज आणि नामांकने सादर करता येतील. पात्रता निकष, मूल्यांकन प्रक्रिया, मार्गदर्शक तत्त्वे आणि अंतिम मुदतीची सविस्तर माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे. Call for applications for National Teacher Award
शालेय शिक्षण क्षेत्रात उत्कृष्टता, नावीन्यपूर्ण कार्य आणि वचनबद्धता दाखविणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन व सन्मान देण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतात. Call for applications for National Teacher Award
