गुहागर, ता. 24 : तालुक्यातील ग्रामपंचायत धोपावे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती, अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण आणि एकल महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना अभिवादन केले. Single Women’s Day Celebrated at Dhopave

ग्रामपंचायतीच्या वतीने समाजकार्यामध्ये उल्लेखनीय योगदानाबद्दल अंगणवाडी मदतनीस श्रीमती प्रतीक्षा चाळके यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या सौ. संचिता पवार यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. एकल महिला दिनानिमित्त गावातील विविध वाड्यांमधून निवड करण्यात आलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच पाच-पाच महिलांचे गट तयार करून त्यांनाही गौरविण्यात आले. या उपक्रमातून महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत त्यांना प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला. Single Women’s Day Celebrated at Dhopave

या कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका-मदतनीस, महिला भगिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. Single Women’s Day Celebrated at Dhopave

