• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 June 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

काताळे येथे नेत्रतपासणी शिबिर

by Guhagar News
June 20, 2026
in Guhagar
28 0
0
Eye Check-up Camp at Katale
55
SHARES
158
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत  २८ जणांची नेत्रतपासणी

गुहागर, ता. 20 : महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत गुहागर तालुक्यातील काताळे ग्रामपंचायतच्या वतीने समता फाउंडेशन आणि भक्तश्रेष्ठ कमलाकर पंत वालावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण २८ लाभार्थ्यांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला.  Eye Check-up Camp at Katale

ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने हे अभियान राबविले आहे. तवसाळ खुर्द, तवसाळ आणि काताळे या महसूल गावांचा समावेश असलेल्या काताळे ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली व उपकेंद्र तवसाळ खुर्द यांच्या संपूर्ण आरोग्य पथकाने विशेष सहकार्य केले. Eye Check-up Camp at Katale

Eye Check-up Camp at Katale

शिबिराचे उद्घाटन गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांच्या हस्ते झाले. यावेळी काताळे ग्रामपंचायत प्रशासक सौ. प्रियांका सुर्वे, पडवे ग्रामपंचायत प्रशासक मुजीब जाभारकर, ग्रामपंचायत सदस्य जद भाटकर, नेत्रचिकित्सक नितीश शेट्ये, ओंकार कटक, श्रीधर रसाळ, तवसाळ ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप सुर्वे, काताळे बौद्धवाडीचे ज्येष्ठ ग्रामस्थ यशवंत पवार, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष शंकर यद्रे, संदीप रसाळ तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी योगेश गवारे, विशाल राठोड, शरद गडदे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, उपकेंद्र कर्मचारी, ग्रामस्थ आणि विविध शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Eye Check-up Camp at Katale

या शिबिरामध्ये एकूण २८ लाभार्थ्यांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. तपासणीनंतर ज्यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, अशा रुग्णांच्या शस्त्रक्रिया लवकरच डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात करण्यात येणार असल्याची माहिती नेत्रचिकित्सक डॉ. नितीश शेट्ये यांनी दिली. Eye Check-up Camp at Katale

‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून काताळे ग्रामपंचायत प्रशासक सौ. प्रियांका सुर्वे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. Eye Check-up Camp at Katale

Tags: Eye Check-up Camp at KataleGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share22SendTweet14
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.