गुहागर, ता. 18 : कीर्तनवाडी येथील कन्हैया प्ले स्कूलच्या यावर्षीच्या शैक्षणिक पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच वाचनाची आवड जोपासण्याचे महत्त्व पटवून दिले. शालेय जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात योग्य शैक्षणिक साहित्य उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. Launch of Kanhaiya Play School’s books

या कार्यक्रमास सौ. मावळणकर, सौ. भावे, सौ. सोमण, स्कूल कमिटी अध्यक्षा सौ. सुजाता बागकर, संस्थेच्या महिला विभाग अध्यक्षा सौ. स्वाती कचरेकर, कन्हैया प्ले स्कूलच्या प्राचार्या सौ. आसावरी राऊत तसेच सौ. गोवलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. Launch of Kanhaiya Play School’s books
कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत नव्या शैक्षणिक वर्षासाठी उत्साह दाखविला. कार्यक्रमाचे आयोजन कन्हैया प्ले स्कूलतर्फे करण्यात आले असून उपस्थितांनी उपक्रमाचे कौतुक केले. Launch of Kanhaiya Play School’s books
