• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

by Mayuresh Patnakar
June 16, 2026
in Guhagar
33 0
0
Educational materials distributed by disabled organization
65
SHARES
185
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 16 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने  सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व दिव्यांग सभासदांच्या मुलांसाठी तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक वाटप कार्यक्रम संस्थेचे कार्यालय वरवेली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा उपक्रम गेली 25 वर्ष अविरतपणे सुरू आहे. Educational materials distributed by disabled organization

Educational materials distributed by disabled organization

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आली.  संस्थेचे अध्यक्ष श्री उदय रावणंग सर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करून कार्यक्रमाचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमासाठी  माननीय श्री योगेंद्रजी विचारे वरवेली, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री जानवळकर, तालुकाध्यक्ष माननीय श्री हालदनकर, सौ सुजाता कांबळे मुख्याध्यापिका श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर, श्री मोहन ढेरे माजी मुख्याध्यापक श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर, श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर प्राध्यापक व सर्पमित्र रत्नागिरी,  श्री जय सर आदी मान्यवर तसेच संस्था कार्यकारी मंडळ सल्लागार व सदस्य  उपस्थित होते. Educational materials distributed by disabled organization

शैक्षणिक क्षेत्रातील गरज ओळखून समाजातील दानशूर व्यक्तीनीं शैक्षणिक साहित्य संस्थेला पुरवले. यामध्ये मा. श्री प्रमोद गांधी साहेब मनसे संपर्कप्रमुख गुहागर तालुका पत्ता जिल्हा परिषद सदस्य रत्नागिरी, मा. श्री हेमचंद्रजी पप्पू मोरे साहेब शासकीय स्टॅम्प वेंडर गुहागर, मा. श्री योगेंद्रजी विचारे साहेब वरवली, मा. श्री भाई बोरकर साहेब दाभोळ मुंबई, पार्वती महादेव चौलकर प्रतिष्ठान रानगाव रायगड आदी दात्यानी शैक्षणिक साहित्य देवून सहकार्य केले. तसेच या कार्यक्रमात जास्तीत जास्त गुहागर तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग सभासदांची मुलं तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक साहित्याचा लाभ घेतला. माननीय श्री योगेंद्र जी विचारे साहेब यांनी मार्गदर्शन करताना या शैक्षणिक साहित्याचा उपयोग शालेय अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त झाला. पाहिजे तसेच मोबाईलचा वापरही मुलांनी करू नये असेही मत मांडले. Educational materials distributed by disabled organization

Educational materials distributed by disabled organization

तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पाचवी ते बारावीपर्यंत वैयक्तिक शिष्यवृत्ती देण्याचे घोषित केले तसेच इयत्ता दहावी मध्ये व बारावी मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी 75 टक्के पेक्षा जास्त गुणसंपादन केले तर त्या विद्यार्थ्यांना 21000/- रुपयाची शिष्यवृत्ती देण्याचे घोषित केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी आपापल्या मनोगत व्यक्त करून संस्थेचे कार्याचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  Educational materials distributed by disabled organization

या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रकाश अनगुडे सर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन श्री. रुपेश संदेकर सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री भरत कदम श्री विनायक जाधव सर श्री सुनील मुकणात श्री अनिल जोशी श्री प्रवीण मोहिते श्रावण रावणंग व्यवस्थापक श्री निंबरे आदींनी विशेष प्रयत्न केले. Educational materials distributed by disabled organization

Tags: Educational materials distributed by disabled organizationGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share26SendTweet16
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.