गुहागर, ता. 06 : दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर अडचणीत सापडलेल्या दुर्मिळ ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाचे वनविभाग, पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन्यजीव रेस्क्यू पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी रेस्क्यू करण्यात आले. तीन दिवस उपचार केल्यानंतर या कासवाला पुन्हा समुद्रातील नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. दि. १ जून रोजी पाळंदे गावातील ग्रामस्थ अनिल आरेकर यांनी समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासव किनाऱ्यावर आल्याची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत कासवाला ताब्यात घेतले. Turtle given life by Forest Department

विभागीय वन अधिकारी कांचन पवार आणि सहाय्यक वन संरक्षक प्रियांका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दापोली पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार हर्णे येथील वाइल्ड अनिमल रेस्क्यूअर संघटनेचे सदस्य व कांदळ व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फहाद जमादार यांच्या खाऱ्या पाण्याच्या टँकमध्ये कासवावर सलग तीन दिवस उपचार करण्यात आले. कासवाची प्रकृती सुधारल्यानंतर आज दि. ४ जून रोजी बोटीच्या सहाय्याने त्याला समुद्रात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी अंजर्ले कांदळवन वनरक्षक प्रभू साबणे, दाभोळ कांदळवन वनरक्षक विश्वंभर झाडे, मांग्रो फाउंडेशनचे अधिकारी अभिनय केळसकर तसेच फहाद जमादार उपस्थित होते. Turtle given life by Forest Department
परिक्षेत्र वनाधिकारी कांदळवन कक्ष रत्नागिरी किरण ठाकूर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, समुद्री प्राणी किंवा वन्यजीव अडचणीत आढळल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ८६९३० ३४८०३ वर संपर्क साधावा. समुद्री जैवविविधतेच्या संवर्धनासाठी वनविभाग आणि स्थानिक नागरिकांनी केलेल्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. Turtle given life by Forest Department