सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
रत्नागिरी, ता. 01 : शिवाजी नगर येथील प्रसिद्ध परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात सोमवारी सकाळी अचानक आग लागली. सुरुवातील आग छोटी असताना आगीवर नियंत्रण न मिळवल्याने शॉर्ट सर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला. बघता बघता आगीने मोठे रूप धारण केले आणि आगीने डायलिसिस विभागात धुराचे प्रचंड लोण निर्माण झाल्याने डायलिसिस विभागातील अनेक वृद्ध रुग्ण गुदमरले. Fire at Parakar Hospital

आग लागल्याचे कळताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला, परंतु कर्मचाऱ्यांसह नागरिकांची बचावासाठी धाव घेतली. येथील रुग्णाला कर्मचाऱ्यांनी तत्काळ बाहेर काढत अन्य रुग्णालयात हलवले. आग आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी नगर परिषद च्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. Fire at Parakar Hospital