• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 May 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाराष्ट्र मंदिर संघातर्फे गुहागर तहसीलदारांना निवेदन

by Mayuresh Patnakar
May 28, 2026
in Maharashtra
101 1
0
Statement to Guhagar Tehsildar
199
SHARES
568
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

‘देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याला’ गुहागरातील मंदिरांचा विरोध!

गुहागर, ता. 28 : छत्रपती शिवाजी महाराजांपासून अनेक राजे- संस्थानिकांनी मंदिरांचे व्यवस्थापन, नित्यपूजा, उत्सव अविरतपणे चालू राहावे, या उदात्त हेतूने देवस्थानांना जमिनी दान दिल्या होत्या. या इनाम जमिनी कायद्याने अहस्तांतरणीय आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्र शासन प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ हा कायदा देवस्थानांच्या मालमत्ता हक्कांवर थेट घाला घालणारा असल्याने, या कायद्याला गुहागरातील मंदिरांनी तीव्र विरोध दर्शवला असून, शासनाने हा कायदा मागे घेण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. Statement to Guhagar Tehsildar

गुहागर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि गुहागरातील विविध मंदिरांच्या विश्वस्तांच्यावतीने, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री,महसूल मंत्री यांच्या नावे असलेले निवेदन गुहागरचे तहसीलदार श्री परीक्षित पाटील यांना देण्यात आले. Statement to Guhagar Tehsildar

निवेदन देताना चिखली येथील श्री झोलाई- वाघजाई देवस्थानचे श्री भगवान कदम, श्री हरिश्चंद्र कदम, आरे येथील श्री देवी व्याघ्राम्बरी देवस्थानचे सचिव श्री संदीप भोसले, विश्वस्त श्री दीपक कळझुणकर, चिखली येथील श्री साई मंदिराचे श्री संदीप मांडवकर, श्री देव व्याडेश्वर देवस्थानचे श्री माधव ओक, श्री गजानन वेल्हाळ, श्री दुर्गादेवी देवस्थानचे सेक्रेटरी, श्री संतोष मावळणकर, उपाध्यक्ष श्री गणेश भिडे, वेळणेश्वर येथील श्री देव वेळणेश्वर देवस्थानचे श्री संजय गुरव, शृंगारतळी येथील श्री निळकंठेश्वर देवस्थानचे श्री तानाजी चव्हाण, गुहागर येथील सचिन बामणे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा संघटक श्री सुरेश शिंदे यांचेसह विश्वस्त उपस्थित होते. Statement to Guhagar Tehsildar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarStatement to Guhagar Tehsildarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share80SendTweet50
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.