मुंबई, ता. 23 : इराण आणि अमेरिका युद्धाचा थेट परिणाम भारतात बघायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. दहा दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसांतील ही सलग तिसरी दरवाढ आहे. या ताज्या वाढीमुळे पेट्रोल प्रतिलीटर 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग झाले आहे. Petrol and diesel prices hiked for the third time
वाढलेले हे नवीन दर आज 23 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात लागू करण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढणार असल्याने रोजच्या गरजेच्या वस्तू आणखी महाग होण्याची भीती वर्तवली जात आहे. आता सतत पेट्रोल आणि डिझेलच्या कितमीमध्ये वाढ होत आहे. केंद्र सरकारकडून या काळात मार्ग काढण्याकरिता एका मागून एक मोठे निर्णय घेतले जात आहेत. सोने न खरेदी करण्याचे आवाहन अगोदरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आले. आता पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली. इराण आणि अमेरिका युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ होत आहे. जोपर्यंत इराण आणि अमेरिका युद्ध थांबणार नाही, तोपर्यंत हे भाव वाढतच जाणार असल्याचे बोलले जात आहे. Petrol and diesel prices hiked for the third time

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. देशभरात आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये भाव वाढ करण्यात आली. पश्चिम आशियातील युद्धाच्या परिस्थितीमुळे देशात इंधनाचा तुटवडा निर्माण होणार, अशी भीती आणि अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्टीकरण जारी केले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये आणि आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे. काही पेट्रोल पंपांवर निर्माण झालेला तात्पुरता ताण दूर करण्यासाठी तेल कंपन्यांकडून सतत देखरेख आणि समन्वय सुरू आहे. Petrol and diesel prices hiked for the third time
