• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 May 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के

by Guhagar News
May 15, 2026
in Guhagar
65 1
0
Degree examination results in Patpanhale College
128
SHARES
366
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पदवी परिक्षेत उत्तुंग यश मिळवून गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे. मुंबई विद्यापीठाचा निकाल हा 55% असून देखील महाविद्यालयाचा निकाल हा 100 टक्के लागला आहे. यामध्ये कु. साळवी दीक्षा ज्ञानेश्वर 87.50 %, कु. आंबेकर अमृता दिलीप 87 %, कु. साळवी वैष्णवी मुरारी 82.50 %  गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.  Degree examination results in Patpanhale College

मुंबई विद्यापीठाचा तृतीय वर्षे वाणिज्य वर्गाचा सत्र सहाचा निकाल 14 मे रोजी जाहीर झाला. सदर परीक्षेमध्ये एकूण 62 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील 32 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी ए देसाई यांनी विशेष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Degree examination results in Patpanhale College

या सर्व विद्यार्थ्यांना वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष खोत, प्रा. कांचन कदम मॅडम, प्रा. सुभाष घडशी आणि प्रा. गजभिये लंकेश यांचे विशेष असे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये शंभर टक्के निकाल लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. विद्यार्थ्यांचा नियमित सराव, अतिरिक्त तास आणि वैयक्तिक लक्ष यामुळे इतके चांगले यश मिळाले असे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ.  सुभाष खोत यांनी सांगितले. या निकालाबद्दल पालकांनी आणि समाजातील विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  Degree examination results in Patpanhale College

Tags: Degree examination results in Patpanhale CollegeGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share51SendTweet32
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.