समर्थ वॉटरस्पोटर्सचे कर्मचारी ठरले देवदूत
गुहागर, ता. 5 : शहरातील खालचापाट परिसरात समुद्रात 2 पर्यटन पोहायला गेले होते. मस्ती करता करता ते खोल समुद्रात गेले. मात्र तेथून त्यांना किनाऱ्याकडे परत येताना दमछाक झाली. सुदैवाने स्थानिक माणसाने त्यांना पाहून नगराध्यक्षांना फोन केला. त्यानंतर समर्थ वॉटरस्पोटर्सच्या दोन कर्मचाऱ्यांनी जेट स्कीने जावून दोघांना वाचवले. हा परिसर जीवरक्षकांच्या कार्यकक्षेत येत नाही. Two people drowning in the sea were rescued.
गुहागरला 7 कि.मी.चा समुद्रकिनारा (Safe and Clean Guhagar Beach) आहे. यापैकी बाजारपेठ परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षक (Lifeguard), सुरक्षारक्षक (Security Guard) तैनात असतात. हे कर्मचारी पर्यटकांना खोल समुद्रात जाण्यापासून रोखतात. त्यामुळे काही पर्यटक सुरक्षा कर्मचाऱ्यांची कटकट नको म्हणून बाजारपेठेपासून दूर समुद्रात पोहोण्यासाठी उतरतात. आज सकाळी गुहागर वरचापाट भंडारवाड्यातील पर्यटन (Tourism) संकुलात रहाण्यासाठी आलेले साताऱ्यातील तीन पर्यटक (Tourist) खालचापाट येथील लक्ष्मी नारायण मंदिरासमोरील पायंडीतून समुद्रावर गेले. तिघांपैकी दोन पर्यटक सिध्दांत पाटील व शुभंकर पाटील समुद्रात पोहायला गेले. समुद्राच्या लाटांबरोबर खेळता खेळता हे दोघेही किनाऱ्यापासून लांब गेले. आपण लांब गेलो आहोत हे लक्षात आल्यावर त्यांनी परतीचा मार्ग धरला. मात्र आहोटी असल्याने त्यांना किनाऱ्याकडे परतता येत नव्हते. अखेर त्यांनी समुद्रातूनच आपल्या मित्राला खाणाखूणा केल्या. वाचविण्यासाठी हाका मारल्या. किनाऱ्याजवळ मँगो व्हिलेजचा केअर टेकर उभा होता. या मित्राने केअर टेकरला सांगितल्यावर त्यांनी लगेच नगराध्यक्ष सौ. मालप यांना फोन लावला व समुद्रात दोघे बुडत असल्याची माहिती दिली. सौ. मालप यांनी तातडीने ही माहिती भाजपचे गटनेते, बांधकाम सभापती व समर्थ वॉटरस्पॉर्टस्चे मालक उमेश भोसले यांना कळवली. भोसले यांनी लगेच रायडर मुजैद्दिन मिरकर आणि सफायत बागकर यांना जेट स्की घेवून पाठवले. या दोघांनी समुद्रात अडकलेल्या दोघांना समुद्रकिनाऱ्यावर आणले. Two people drowning in the sea were rescued.

Samarth Water Sports चे योगदान
पर्यटकांच्या हंगामात गर्दीच्या वेळी किंवा सकाळी व सायंकाळी जीवरक्षक, सुरक्षा रक्षक समुद्रावर उपस्थित असतात. अन्यवेळी हे कर्मचारी किनाऱ्यावर, आसपास असतात. मात्र समर्थ वॉटरस्पोटर्सचे (Samarth Water Sports) कर्मचारी गर्दीच्या हंगामात समुद्रावरच असतात. तसेच जेट स्कीसारखी समुद्राच्या लाटा वेगाने कापत पुढे जाणारी व्यवस्था त्यांच्याजवळ असते. त्यामुळेच यापूर्वी पाचपैकी तीनजणांचे प्राण वाचविण्याचे काम समर्थ वॉटरस्पोर्टसूच्या कर्मचाऱ्यांनी केले. आज आणखी दोनजणांचे प्राण त्यांनी वाचविले. Two people drowning in the sea were rescued.
पर्यटकांनो सावधान
गुहागरमध्ये स्वच्छ किनारा आणि सुरक्षित समुद्र Safe and Clean Guhagar Beach असल्याने स्वाभाविकच प्रत्येकाला समुद्रात डुंबण्याची हौस असते. पर्यटकांना हा आनंद लुटता यावा यासाठीच बाजारपेठेतील समुद्रावर सुरक्षा रक्षक, जीव रक्षकांची व्यवस्था केली आहे. मात्र काही उत्साही पर्यटक पोलीसांची, सुरक्षाकर्मीची कटकट नको म्हणून बाजारपेठेतील समुद्रावर न जाता शहरातील कोणीही नसलेल्या किनाऱ्यावर पोहायला उतरतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. Two people drowning in the sea were rescued.
