गुहागर, ता. 29 : बौद्धजन सहकारी संघ (रजि.), मुंबई, ता. गुहागर या संघाच्या गाव आणि मुंबई शाखेच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त गाव शाखेचे अध्यक्ष सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. ३ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, जानवळे (शृंगारतळी) येथे नामदार डॉ. उदय सामंत (महाराष्ट्र राज्य उद्योगमंत्री व पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा) यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. Buddhist Cooperative Union
सदर कार्यक्रमात धार्मिक पूजापाठ पूज्य भंते विमलबोधी व संस्कार समितीच्या वतीने करण्यात येईल तर पाहुण्यांचे स्वागत मुंबई शाखा अध्यक्ष अशोक कदम यांच्या शुभहस्ते करण्यात येईल. सदर कार्यक्रमात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ३:३० ते सायंकाळी ६:०० या वेळेत महाधम्म रॅली काढण्यात येणार आहे. Buddhist Cooperative Union
सोमवार दि. ४ मे रोजी भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन गाव शाखेचे चेअरमन मारुती धोंडू मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १० ते रात्री १० या वेळेत करण्यात आले आहे. यावेळी विविध बौद्धिक, शारीरिक, प्रबोधनात्मक, करमणुकीच्या कार्यक्रमांचे तसेच महिलांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून रात्री ठीक १०:०० वाजता निखिल विजय गमरे आणि कोकणकन्या कु. तेजल जाधव यांच्या जंगी कव्वालीच्या सामन्याचे आयोजन जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती, रत्नागिरी जिल्हाचे सदस्य सुरेश भिकाजी सावंत यांच्या सौजन्याने सादर करण्यात येणार आहे. Buddhist Cooperative Union
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. चे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, गुहागर विधानसभेचे माजी आमदार डॉ. विनय नातू, पंचायत समिती गुहागरचे उपसभापती निलेश सुर्वे, गुहागर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सौ. निता विकास मालप, गुहागर तालुक्याचे तहसिलदार परिक्षीत पाटील, गुहागर तालुक्याचे गटविकास अधिकारी परेश शिरसाट, गुहागर विधानसभेचे आमदार भास्कर जाधव, पंचायत समिती गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, गुहागर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, गुहागर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, सीईओ स्वप्निलजी चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. सदर प्रसंगी गाव व मुंबई विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती विभाग अधिकारी, उपसमित्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी गाव व मुंबई विभागातून सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे तरी सदर सोहळ्यास आपल्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आले आहे. Buddhist Cooperative Union