रत्नागिरी, ता. 25 : जिल्ह्यामध्ये चालू वर्षी कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा व काजू या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शासन पत्र दि. १३.०४.२०२६ नुसार, बाधित क्षेत्राचे NDRF / SDRF निकषानुसार तातडीने पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. Panchnama of mango and cashew area
सदर नुकसानीचे मूल्यमापन अचूक होण्यासाठी महसूल विभाग, कृषी विभाग व जिल्हा परिषद विभाग यांच्यामार्फत ग्रामस्तरावर सहाय्यक कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचेकडून संयुक्त पंचनामे करण्यात येणार आहेत. सदरची नैसर्गिक आपत्ती व्यापक स्वरूपाची असून रत्नागिरी जिल्ह्यात आंबा व काजू फळबागांचे उत्पादनक्षम क्षेत्र १,५६,९६० हे आहे. त्याअनुषंगाने संबंधित तहसिलदार यांचेमार्फत गावनिहाय पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित होऊन बाधित आंबा व काजू फळबागांचे पंचनामे करण्यात येणार आहेत. Panchnama of mango and cashew area
शासनाच्या निर्देशानुसार तिन्ही यंत्रणांनी सदर पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश श्री. मनुज जिंदल, जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी दिले आहेत. यानुषंगाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त आंबा व काजू फळबागधारक शेतकऱ्यांनी आपले संबंधित ग्राममहसूल अधिकारी, सहायक कृषि अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांचेसोबत संपर्क साधून आपले बाधित क्षेत्राचा पंचनामा करून घेण्याची कार्यवाही करावी जेणेकरून सदर लाभापासून आपण वंचित राहणार नाहीत. असे आवाहन शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे. Panchnama of mango and cashew area
