श्री देव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ यांच्या वतीने आयोजन
गुहागर, ता. 30 : श्री देव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ गुहागर यांच्या वतीने गुरूवार दिनांक 02 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव श्री देव व्याडेश्वर मंदिर प्रांगणात येथे साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Hanuman Janmatsav at Sri Dev Vyadeshwar

यामध्ये सकाळी 05.30 वाजता कीर्तनकार मनाली मनोज बावधनकर यांचे जन्मोत्सवाचे कीर्तन, सकाळी 0९.30 वाजता श्रींची षोडशोपचार पूजा, अभिषेक, लघुरुद्र, सकाळी 10 वाजता सुरभी महिला भजन मंडळ गुहागर बाजारपेठ बुवा तनुजा भावे आणि मंडळी यांचे भजन सकाळी 11 वाजता श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ आरे बुवा श्री साई कळझुणकर आणि मंडळी यांचे भजन, दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी 03 वाजता स्वरसाधना महिला भजन मंडळ खालचापाट बुवा आदिती धनावडे व मंडळी यांचे भजन, सायंकाळी 04 वाजता श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ पालशेत बुवा श्री महेश होळंम आणि मंडळी याचे भजन, सायंकाळी 5.30 ते 7.30 वाजता लळीतांचे कीर्तन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री हनुमान देवस्थान फंड गुहागर यांनी केले आहे. Hanuman Janmatsav at Sri Dev Vyadeshwar
