गुहागर, ता. 23 : शहरात प्रथमच गुहागर शहर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शहर क्रिकेट संघटना गुहागर यांनी केले आहे. या स्पर्धेचे आयोजन दिनांक 27 मार्च ते 29 मार्च रोजी करण्यात आली असून या स्पर्धा व्याघ्रंबरी मंदिरासमोरील भाटवणे मैदानात होणार आहेत. Guhagar City Premier League

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास बक्षीस पंचवीस हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास पंधरा हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकास पाच हजार रुपये व आकर्षक चषक तसेच इतर बक्षीसे मॅन ऑफ द सिरीस साठी सायकल, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज व सामनावीर यांना आकर्षक चषक अशी बक्षीस ठेवण्यात आली आहेत. Guhagar City Premier League
या स्पर्धेसाठी जय मल्हार वॉरियर्स, कन्हैया प्ले स्कूल, गुहागर फायटर्स ,ओम साई इलेव्हन, जिजा इलेव्हन, गावदेवी वॉरियर, नरू दादा वॉरियर, गुहागर जिमखाना, ब्रह्म वॉरियर्स व जुहूर वॉरियर्स या संघानी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. Guhagar City Premier League

