• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 March 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी येथे दागिन्यांच्या दुकानात चोरी

by Guhagar News
March 13, 2026
in Guhagar
77 0
0
Accused arrested for theft in Shringartali
151
SHARES
430
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चार आरोपी ताब्यात, सुमारे ११.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गुहागर, ता. 13 : तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील दागिन्यांच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे ११ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुहागर येथील शृंगारतळी बाजारपेठेत असलेल्या ‘ओंकार ज्वेलर्स’ या दुकानात दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे १.३१ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी दुकानाचे बाहेरील कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. त्यानंतर दुकानातील तिजोरी तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. Accused arrested for theft in Shringartali

या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (६), ३३१ (४) व ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि विशेष पथकाच्या कारवाईच्या आधारे पोलिसांनी खालील चार संशयीत आरोपींना मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. 1. इरफान निशांत सुधीर आंबोकर (रा. बीएसटी कॉलनी, पंतनगर, घाटकोपर, मुंबई) 2. मोईन शकील शेख (रा. गोपाल भवन, घाटकोपर, मुंबई) 3. सुमित कल्पेश चव्हाण (रा. कोहिनूर सिटी, कुर्ला, मुंबई) 4. आयुष चितेंद्र धाडगा (रा. तानसा पाइपलाईन, लक्ष्मण नगर, घाटकोपर, मुंबई)

आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले एक चारचाकी वाहन तसेच इतर साहित्य असा एकूण ११,९५,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. Accused arrested for theft in Shringartali

Tags: Accused arrested for theft in ShringartaliGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet38
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.