यजमान महापुरुष संघ विजेता तर स्वयंभू अंजनवेल संघ उपविजेता
गुहागर, ता. 03 : महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ गुहागर यांच्या वतीने ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत यजमान महापुरुष संघानेच प्रथम क्रमांक पटकावला. तर स्वयंभू अंजनवेल यांनी उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून 32 संघानी सहभाग घेतला. Cricket tournament on behalf of Mahapurush Mandal
अत्यंत चूरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात महापुरुष गुहागर संघाने स्वयंभू अंजनवेल संघावर शेवटच्या चेंडूवर षटकाराची नोंद करत मानाचा चषक स्पर्धा जिंकत विजेतेपद जिंकले तर स्वयंभू अंजनवेलसंघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघास रू 20000/- रोख व उपविजेत्या संघास ₹ 15000/- रोख व चषक देण्यात आला. अंतिम सामना सामनावीर कुणाल देसाई, उत्कृष्ट फलंदाज सु्जित बागकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रसाद बोलें, उत्कृष्ट गोलंदाज राकेश राऊत, मालिकावीर -ऋतिक पारदी यांना गौरवण्यात आले. Cricket tournament on behalf of Mahapurush Mandal

यावेळी खेळाडूंना प्राधान्य देण्यासाठी विविध स्तरावरील मान्यवरांनी उपस्थिती लावली. गुहागरात मोठ्याप्रमाणात खेळाडूं असून शहरात एक क्रीडासंकुल आणि क्रिडांगण उभारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची मागणी महापुरुष मंडळाचे अध्यक्ष संतोष गुहागरकर यांनी केली. बक्षीस वितरण समारंभ गुहागरचे उत्पादन नगराध्यक्ष प्रदीप बेंडल, शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे, शामकांत खातू, संतोष वरंडे, भाऊ कनगुटकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महापुरुष मंडळाचे सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. Cricket tournament on behalf of Mahapurush Mandal
