• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर बाजारपेठेतील रस्त्याचे डांबरीकरण करावे

by Manoj Bavdhankar
February 25, 2026
in Guhagar
16 0
0
Road in Guhagar market should be asphalted
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागरतील नागरिक आक्रमक

गुहागर, ता. 25 : गुहागर बाजारपेठ ते पोलीस स्टेशन या रस्त्याची चाळण झाली असून यातील काही रस्ता फ्लेवर बॉक्स उर्वरित डांबरीकरण असे करण्यात येणार होते परंतु यावर आज गुहागरतील नागरिक आक्रमक झाले व येथील पेपर ब्लॉक  रद्द करून हा रस्ता डांबरीकरण करावा अशी  ग्रामस्थांनी मागणी केली आहे. याबाबत नगरसेविका अनुषा भावे व ग्रामस्थांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग  गुहागर यांना लेखी निवेदन दिले असून यात गुहागर बाजारपेठेतील रस्त्याचे पेवर ब्लॉकऐवजी पूर्ण लांबीत डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. Road in Guhagar market should be asphalted

गुहागर बाजारपेठेतील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून  मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यापैकी बाजारपेठेतील खराब १५० मीटर लांबीच्या दुरूस्तीचे नियोजनात  ८० मीटर भागात पेवर ब्लॉक बसवण्यात येणार होते. पेवर ब्लॉक इंटरलॉकिंग असल्याने त्यांच्या फटीतून पाणी खाली मुरते, ज्यामुळे पाया कच्चा होऊन रस्ता खचतो. तसेच बाजारपेठेत पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उतार नसल्यास पेवर ब्लॉकवर पाणी साचून राहील. एकूण १५० मीटर खराब रस्त्यापैकी फक्त ८० मीटर मध्ये पेवर ब्लॉक चे काम केल्यास उर्वरीत भाग तसाच राहील. यामुळे सखल भागात पाणी साचून नवीन केलेले कामही खराब होऊ शकते. बाजारपेठेत वाहनांची आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी पेवर ब्लॉक निसरडे  किंवा कालांतराने वर- खाली होऊन अपघात होऊ शकतात. यामुळे पेवर ब्लॉक ऐवजी दर्जेदार डांबरीकरण करून पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. Road in Guhagar market should be asphalted

वेलदुर ते गुहागर खड्डे भरण्यासाठी सुमारे 19 लाखाचे काम मंजूर झाले आहे. हे काम करणारे ठेकेदार दिरंगाईने व निकृष्ट दर्जाचे काम करत असल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. या मागणीसाठी ग्रामस्थ गुहागर येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात गेले असता या कामाचे ठेकेदार ठेकेदारांनी ग्रामस्थांना उलट सुलट बोलल्यामुळे वातावरण संतप्त झाले होते. उपअभियंता स्वप्निल पाटील यांनी ठेकेदाराबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे ग्रामस्थांना सांगितल्यावर ग्रामस्थ शांत झाले. Road in Guhagar market should be asphalted

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRoad in Guhagar market should be asphaltedटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.