गुहागर, ता. 21 : तालुक्यातील रिगल कॉलेज शृंगारतळी येथे दि. 20 फेब्रुवारी रोजी योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेसाठी योग प्रशिक्षिका मा. सौ.आदिती गणेश धनावडे उपस्थित होत्या. सर्वप्रथम प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. Yoga workshop at Regal College Shringartali

यावेळी सौ. आदिती गणेश धनावडे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगितले. दैनंदिन जीवनामध्ये योगाचे होणारे फायदे स्पष्ट केले. यानंतर त्यांनी विविध आसने प्राणायाम आणि ध्यान या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. यामध्ये ताडासन, वृक्षासन, वज्रासन, मंडूकासन, पद्मासन, नौकासन, चक्कीचलासन, गोमुखासन तसेच डोळ्यांचा ताणतणाव कमी करण्यासाठी उपयुक्त असणारे व्यायामाचे प्रकार दाखवले. मनशांतीसाठी काही विशेषतंत्र शिकवली. Yoga workshop at Regal College Shringartali

प्रत्येक आसनानंतर प्रशिक्षकांनी त्यांचे फायदे योग्य पद्धत आणि आसन करताना घ्यावयाची काळजी याबद्दल सखोल माहिती दिली. तसेच त्यांनी ताणतणाव कसा कमी करावा. एकाग्रता कशी वाढवावी आणि नियमित योगाभ्यासाने सकारात्मक जीवनशैली कशी स्वीकारावी हेही समजावून सांगितले. तसेच विविध आजारांपासून आपले रक्षण करण्यासाठी योगा कसे कार्य करते याबद्दलही माहिती दिली. कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्ट शारीरिक स्वास्थ्य मानसिक ताण कमी करणे आणि विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त करून देणे होते. कार्यशाळेच्या शेवटी मा. सौ. आदिती धनावडे यांनी योग केवळ शारीरिक व्यायाम नसून तो जीवनाला दिशा देणारी जीवनशैली आहे हा संदेश देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. Yoga workshop at Regal College Shringartali

सदर कार्यशाळेसाठी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री.संजयराव शिर्के संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. Yoga workshop at Regal College Shringartali
