गुहागर : मंगळवारी सायंकाळी गेले होते मासे गरवायला
गुहागर, ता. 22 : आरेगावमधील दोन तरुण सोमवारी 21 जूनला सकाळी मासे गरवायला बागेतील पाचमाड परिसरात समुद्रावर गेले होते. हे तरुण मंगळवारी 22 जूनला सकाळपर्यंत परत आले नाहीत. बाग परिसरातील पाचमाड समुद्रकिनारी त्यांची मोटरसायकल दिसून आली. त्यामुळे दोघेही समुद्रात बेपत्ता झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामस्थ आणि पोलीस या दोन तरुणांचा शोध घेत आहेत. सिद्धांत संदेश साटले (वय 23) रहाणार आरे कलमवाडी आणि प्रतीक किसन नावले (वय 25) रहाणार आरे नागदेवाडी अशी या दोन तरुणांची नावे आहेत.


Two youths from Aregaon had gone to sea in the Pachmad area of the garden on Tuesday evening, June 21 to fish. The young men did not return until Wednesday morning. So both are feared to have disappeared at sea. The villagers and police are searching for the two youths. Siddhant Sandesh Satle (age 23) will be Aarey Kalamwadi and Prateek Kisan Nawale (age 25) will be Aarey Nagdewadi.