• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर कोपरी नारायण मंदिरात योगशिबीर – मार्गदर्शन कार्यक्रम

by Guhagar News
February 21, 2026
in Health
40 0
0
Yoga camp at Kopri Narayan Temple
78
SHARES
224
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दिनांक 23 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत आयोजन

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थान फंड व श्री अंबिका योग कुटीर ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने योगशिबीर – मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 23 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हे शिबीर श्री देव कोपरी नारायण देवस्थान वरचा पाट येथे घेण्यात येणार आहे. विशेष  म्हणजे प्रथम येणाऱ्या 50 जणांनाच प्रवेश देण्यात येईल. Yoga camp at Kopri Narayan Temple

या योग शिबिराच्या माध्यमातून जनमानसामध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण करण्याकरिता श्री अंबिका योग कुटीर ठाणे यांच्या तज्ञ व ज्येष्ठ शिक्षक व शिक्षकांद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल. सदर शिबिरामध्ये मधुमेह, हृदयविकार, पाठ दुखी, कंबर दुखी, मानदुखी,, गुडघेदुखी व इतर शारीरिक व्याधींविषयी समज, गैरसमज व त्यावर आवश्यक उपाय व आपण घ्यावयाची काळजी संबंधी विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाईल. Yoga camp at Kopri Narayan Temple

या शिबीरासाठी दि. 23 फेब्रुवारी सायंकाळी 4 ते 6 वाजता नोंदणी व परिचय घेण्यात येईल. तर दि. 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी सकाळी 6 ते 8 वाजता योग प्रशिक्षण घेतले जाईल. तरी या योग शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा, असे श्री देव कोपरी नारायण देवस्थान कडून कळविण्यात आले आहे.  याबाबत अधिक माहितीसाठी अद्वैत गोखले 9421934327 या नंबर वर संपर्क साधावा. Yoga camp at Kopri Narayan Temple

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarYoga camp at Kopri Narayan Templeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share31SendTweet20
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.