गुहागर, ता. 27 : तुकारामांच्या उक्तीप्रमाणे वाचनाने माणूस प्रगल्भ होतो वाचन, मनन, चिंतन आणि आत्मचिंतनाकडे वळतो. आत्मचिंतन केलेला माणूस जगाच्या पाठीवर कुठेच मागे पडत नाही. जीवनात वाचन आणि पुस्तक माणसांना घडवताना दिसतात, असे प्रतिपादन गुहागर नगरपंचायत चे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी केले. ‘ज्ञानरश्मि’ वाचनालयाचा अमृत महोत्सवी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. Amrit Mahotsav celebration of Gyanrashmi Library

यावेळी व्यासपीठावर गुहागर नगरपंचायत चे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, नगराध्यक्ष नीता मालप, दुर्गादेवी देवस्थान अध्यक्ष किरण खरे, व्याडेश्वर देवस्थान देवस्थान अध्यक्ष शार्दुल भावे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर व्यासपीठावर उपस्थित होते. Amrit Mahotsav celebration of Gyanrashmi Library

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ज्ञानरश्मी वाचनालय ग्रंथदिंडी ने या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या ग्रंथदिंडीत जिवन शिक्षा शाळा नंबर 1 चे विद्यार्थी, श्री देव गोपाळ कृष्ण विद्या मंदिर चे विद्यार्थी, झांज पथक, ढोल पथक घेऊन उपस्थित होते. तसेच नागरिकांनीही या दिंडीत सहभाग घेतला होता. Amrit Mahotsav celebration of Gyanrashmi Library

यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध स्पर्धांतील विजेते, उत्कृष्ठ ज्येष्ठ वाचक, गुणवंत विद्यार्थ्यांचा यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला गुहागर उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, दत्तात्रय गुरव, ज्ञानेश्वर झगडे, ऍड संकेत साळवी, बाबासाहेब राशिनकर, प्रभुनाथ देवळेकर, ईश्वर हलगरे, माजी मुख्याध्यापिका वंदना माने, विवेक जोशी, नरेश पवार, माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे, पारिजात कांबळे, बाया ताई आठवले, शिक्षिका दिपाली माळी, विद्या चव्हाण, अजित देशपांडे सर, सर्व नगरसेवक, नगरसेविका, ग्रंथपाल सोनाली घाडे, शामली घाडे व सानिका जांगळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली बावधनकर यांनी केले. Amrit Mahotsav celebration of Gyanrashmi Library
