• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात वीजेचा खेळखंडोबा

by Mayuresh Patnakar
June 20, 2021
in Old News
17 0
1
Guhagar Sub Station
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

 9 महिन्यांपूर्वी सुरु केलेल्या उपकेंद्रात होतोय बिघाड

गुहागर, ता. 20 : मुसळधार पाऊस सुरु झाल्यानंतर गुहागर शहर आणि परिसरात वीजेचा खेळखंडोबा सुरु झाला आहे. गेले चार दिवस सतत वीजेच्या लपंडाव सुरु आहे. यासाठी 9 महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आलेले महावितरणचे नवे उपकेंद्र कारणीभूत ठरत आहे. येथे नित्यनेमाने येणाऱ्या अडचणींमुळे जनतेबरोबरच महावितरणचे कर्मचारीही त्रासले आहेत.
After the onset of torrential rains, power play has started in Guhagar city and its environs. For the last four days, there has been continuous power outage. This is due to the new sub-center of MSEDCL which was started 9 months ago. Due to the regular problems that come here, not only the people but also the employees of MSEDCL are suffering.
गुहागर शहरासह असगोली आणि वरवेली परिसरासाठी स्वतंत्र उपकेंद्र बांधण्यात आले.  या केंद्राचे काम 2018 च्या अखेरीस पूर्ण झाले होते. मात्र शृंगारतळी उपकेंद्रातून या उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या 33 के. व्ही. दाबाच्या वीज वाहिनीच्या काम रखडले होते. ते काम पूर्ण झाल्यानंतर तब्बल वर्षभराने 3 ऑक्टोबर 2020 ला हे उपकेंद्र कार्यरत झाले. दरम्यानच्या काळात उपकेंद्र सुरु न झाल्याने येथील अनेक गोष्टी गंजू लागल्या. त्याचा फटका उपकेंद्र कार्यरत झाल्यानंतरच्या पहिल्या पावसाळ्यात बसत आहे. काहीवेळा वीज वाहिन्या जोडणारी गंजलेली ब्रॅकेट गरम होवून तुटतात, तर काही वेळा गंजलेले नट बोल्ट तुटतात. एखादी वीज वाहिनी स्पार्क होत रहाते. एखादी छोटीशी घटना देखील अत्याधुनिक नियंत्रण कक्षात नोंदवली गेली की संपूर्ण वीज व्यवस्था बंद पडते. मग बिघाड कोठे झाला आहे ते शोधुन दुरुस्त करेपर्यंत वेळ जातो. त्यामुळे वीज प्रवाह वारंवार खंडीत होतो. अशी माहिती गुहागर उपकेंद्राच्या उपअभियंता कु. प्रियांका वाठोरे यांनी दिली. दररोज वेगवेगळ्या अडचणींचा सामना उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे कर्मचारी देखील त्रासलेले आहेत. तर निर्बंध शिथिल झाल्यावर हळुहळु उद्योग व्यवसाय रुळावर येत असताना महावितरणच्या या अघोषित डाऊनमुळे जनता हैराण झाली आहे. (Electricity Problem in Guhagar)

वानरांनीही गमावला जीव
उपकेंद्र बंद असताना येथे वानरांचा वावर होता. ते वीज वाहिन्यांवर खेळत असतं. उपकेंद्रातील वीजवाहिन्या प्रवाहीत झाल्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबर 2020 हे दोन महिने उपकेंद्रात वीजेचा धक्का लागून सुमारे 25 वानरांचा मृत्यू झाला. अनेक जखमीही झाले. त्या दोन महिन्यात सातत्याने वीजेचा लपंडाव  सुरु होता.

 व्हिडिओ न्यूज पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Tags: Breaking NewsElectricityGuhagarGuhagar NewsHeavy RainLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMSEDLNews in GuhagarNews in MarathiSub Stationउपकेंद्रटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यामहावितरणमुसळधार पाऊसलेटेस्ट अपटेड्सलोकल न्युजवीज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.