आमदार भास्कर जाधव
गुहागर, ता. 22 : मी जात-पात काही बघत नाही बहुजन समाजाचे नेतृत्व करतो या निवडणुकीत कुठला समाज लहान आहे कुठला समाज मोठा आहे याचा विचार केला नाही. अकरा समाजातील उमेदवारांना निवडणुकीत मी उमेदवारीची संधी दिलेली आहे. या सर्व बहुजनांना निवडून आणा, असे आव्हान आमदार भास्कर जाधव यांनी केले. जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समिती गणाच्या दहा जागांसाठी उभाटा मनसे आघाडीचे उमेदवारी अर्ज भरायला आलेले असताना आमदार भास्कर जाधव बोलत होते. District Council and Panchayat Samiti Election
2017 पर्यंत सगळ्या निवडणुका ठरलेल्या कालावधीत घटनेनुसार व्हायच्या परंतु आता निवडणुका वेळेवर घ्यायची सरकारची मनस्थिती नव्हती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार या निवडणुका होत आहेत या सरकारला लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही राबवायचे आहे. एका नेत्याने कारभार चालवावा असा प्रकार गेले बारा वर्षे या देशात सुरू आहे. मी गुहागर मध्ये राजकारणात आल्यापासून अनेकांना असे वाटत होते ही कायमस्वरूपी सत्ता आमच्या हातात राहील. जनतेला विकासापासून दूर ठेवलं होतं. परंतु मी प्रत्येकाला वेचून लोकांच्या घराघरापर्यंत गेलो व लोकांना विश्वास दिला तुम्ही जर तालुक्यात परिवर्तन बदल घडवलात तर नक्कीच भास्कर जाधव तुमच्या पाठीशी राहील, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे मी सर्वांगीण विकास केला व सर्वांच्या अडीअडचणीला धावून गेलो. यामुळे लोकांच्या मनात आमच्याबद्दल विश्वास निर्माण झाला. आमदार की जिंकली, पाठोपाठ जिल्हा परिषद पंचायत समिती व नव्याने निर्माण केलेली गुहागर नगरपंचायत हे तुम्ही माझ्या ताब्यात दिलीत. त्याप्रमाणे मी कोट्यावधी रुपयाचा निधी आणला. District Council and Panchayat Samiti Election

काहींनी काहींच्या मनात समाजाचं विष पेरले. गेल्या वेळी समाजाच्या नावावर नगरपंचायत घेतली परंतु यावेळी त्या समाजाचे नावही पुसून टाकलं. तुम्हाला हाताशी धरून पक्षाचे नाव लावलं आता समाजाचा नगराध्यक्ष नाही तर पक्षाचा नगराध्यक्ष झाला आहे. मला शह द्यायला जमणार नाही. यामुळे समाजाचा आधार घेऊन हा प्रयत्न केला जात आहे. समाजाचा आधार घेऊन आपण स्वतः गादीवर बसायचं हा काहींचे कटकारस्थान आहे. हा गुहागर विधानसभा मतदार संघ मी जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत मला बाजूला करणार नाही याची मला खात्री आहे. District Council and Panchayat Samiti Election
लाडक्या बहिणीचे जे पंधराशे रुपये येतात ते तुम्ही मतदान आम्हाला केलं नाहीत तर बंद होतील, असे काही जण कानात जाऊन सांगतात. परंतु तुम्ही हे लक्षात ठेवा तुम्ही मला मतदान केलं तरीही कोणाच्या बापाचा बाप ते पैसे बंद करू शकत नाही. वेळणेश्वर जिल्हा परिषद गटात नेत्रा ठाकूर असताना मी अनेक विकास काम मी मंजूर करून आणली. परंतु कामासाठी मी दुसऱ्या पक्षात जात आहे, असे सांगून त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. मी आणलेली सर्व कामे उत्कृष्ट दर्जाची करून कामांचे वाटोळ केलेला आहे. एकही काम दाखवण्यासारखं शिल्लक नाही, असे जाधव यांनी सांगितले. तसेच जे माझ्यापासून दूर झालेले आहेत. त्यांनी मागील सर्व विसरून परत माझ्याबरोबर यावे असे आव्हान त्यांनी केले. यावेळी उबाटा मनसे चे उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. District Council and Panchayat Samiti Election
