रत्नागिरी, ता. 21 : गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही प्रजासत्ताकदिनी रत्नागिरी शहरात ई-यंत्रण अर्थात इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या संकलनाचा मोठा उपक्रम राबवला जाणार आहे. रत्नागिरीतील अनबॉक्स युवर डिझायर आणि पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे. मांडवीपासून खेडशीपर्यंत रत्नागिरीतील एकूण १३ केंद्रांवर या दिवशी ई-कचरा स्वीकारला जाणार असून, त्याचे नंतर शास्त्रीय पद्धतीने रिसायकलिंग केले जाणार आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होऊन नागरिकांनी देशाच्या स्वच्छतेमध्ये मोठा हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा उपक्रम याच दिवशी रत्नागिरीसह राज्यातील १९ शहरांमध्ये राबवला जाणार आहे. गेल्या वर्षी रत्नागिरीतून एक टनाहून अधिक ई-कचरा संकलित झाला होता. E-waste collection
ई-कचऱ्याच्या निर्मितीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणेही वेगाने बदलावी लागतात. त्यामुळे ई-कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास हवा, पाणी आणि जमिनीचे प्रदूषण होते. म्हणूनच शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट आणि पुनर्वापर यासाठी ई-कचरा संकलित करणे अत्यावश्यक आहे. E-waste collection
पूर्णम इकोव्हिजन ही पुण्यातील संस्था गेले दशकभर पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असून, असे उपक्रम संस्थेतर्फे सातत्याने राबवले जातात. रत्नागिरीत गेल्या वर्षी प्रथमच ई-यंत्रण हा उपक्रम राबवण्यात आला आणि अनबॉक्स युवर डिझायर या संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला होता. गेल्या वर्षी रत्नागिरीकरांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे यंदाही हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती ‘अनबॉक्स’चे गौरांग आगाशे यांनी दिली. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे. गेल्या वर्षी रत्नागिरीतून एक टनाहून अधिक ई-कचरा संकलित झाला होता. त्यामुळे तेवढा कचरा पर्यावरणात जाण्यापासून वाचला होता. E-waste collection
ई-यंत्रण या उपक्रमांतर्गत २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ई-कचरा संकलन करण्यात येणार आहे. ई-कचऱ्यामध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन, प्रिंटर, कम्प्युटर, माउस, फॅन्स, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह, पेनड्राइव्ह, टीव्ही, डिजिटल कॅमेरा, एसी, व्हिडिओ कॅमेरा, सीडी / डीव्हीडी प्लेयर, मोबाइल फोन, होम थिएटर्स, चार्जर्स, हेडफोन्स आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स वर्किंग आणि नॉन वर्किंग आणि डिस्पोझेबल वस्तूंचा समावेश आहे. बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे रिसायकलिंग केले जाणार आहे. सुरू असलेले, परंतु वापरात नसलेले जुने कम्प्युटर्स किंवा अन्य वस्तूही कोणाला स्वेच्छेने द्यायच्या असल्यास देता येतील. या वस्तूंची आवश्यक दुरुस्ती करून त्या वस्तू ग्रामीण भागातील शाळांना दिल्या जाणार आहेत. E-waste collection
ई-कचऱ्यामध्ये फ्लोरोसंट ट्यूबलाइट्स, इनकॅन्डेसन्ट बल्ब, सीएफएल यांचा समावेश नाही.
ई-कचरा संकलन केंद्रांची यादी
अनबॉक्स युवर डिझायर – 8767461499 – नाचणे-साळवी स्टॉप लिंक रोड, रत्नागिरी.
आगाशे फूडकोर्ट – 9209414199
अनुश्रुती एंटरप्रायझेस-पितांबरी शॉपी, श्रीनगर-खेडशी, 9423292162
सावंत रोडलाइन्स – 9423297470 – साळवी स्टॉप.
श्री धन्वंतरी आयुर्वेद – 9665055654 – मारुती मंदिर.
श्री धन्वंतरी एंटरप्रायझेस – 9421079654 – शांतीनगर.
मानस किराणा स्टोअर – 9011662220 – माळनाका.
डिक्सन सप्लायर्स – 9422052613 – जिल्हा परिषद कार्यालयाजवळ.
आर्यक सोल्युशन्स – 9420907533 – रमेशनगर.
हॉटेल सी फॅन्स – 9822290859 – मांडवी.
सुरस स्नॅक्स – 9604214101 – कारवांचीवाडी.
खादाडी कट्टा – 8668201414 – जोशी पाळंद.
रत्नागिरीतील सर्व ठिकाणांची लोकेशन लिंक – https://poornamecovision.org/events/mega-drives/e-yantran-2026/ratnagiri
‘ई-यंत्रण’ ई-कचरा जनजागृती आणि संकलन अभियानांतर्गत सहभागी होणारे स्वयंसेवक गौरांग आगाशे – 9730310799, चिन्मय भागवत – 8888798845, गुरुप्रसाद जोशी – 9552546468, रत्नाकर जोशी – 9422052613, महेंद्र दांडेकर – 7410104433, शरदचंद्र वझे – 9822978033, हृषीकेश सरपोतदार – 9405338354, नेहा गोखले – 9359863349, अमेय मुळ्ये – 9404330003, भाग्यश्री सुर्वे – 7249822776.