गुहागर, ता. 19 : खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड या शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा यांना The times of India चा स्टार एज्युकेशन पुरस्कार- 2025 प्राप्त झाला आहे. सदर पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो. The times of India स्टार एज्युकेशन मार्फत सामाजिक औद्योगिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कारांचे वितरण केले जाते. Deepak Laddha gets Star Education Award
मा. दीपक लढढा यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट विश्वस्त म्हणून या पुरस्काराने गौरविण्यात आले. गेली 15 ते 20 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात तसेच व्यावसायिक व क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच वरिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर उत्कृष्ट दर्जाचे निकाल देणे, स्पर्धा परीक्षा व विविध क्रीडांमध्ये उत्तुंग यश मिळवून देणे, त्याचप्रमाणे नावीन्यतेचा ध्यास घेणे व सकारात्मक दृष्टीने विचार करणे हे तत्त्व उराशी बाळगून सतत कार्यरत राहणे हे त्यांचे वैशिष्टय. Deepak Laddha gets Star Education Award
मा. दीपक लढढा यांनी * संस्थापक सदस्य , विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी – ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) * चेअरमन नियामक मंडळ व महाविद्यालयीन विकास समिती ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य मोरवंडे – बोरज ता. खेड * अध्यक्ष – शिवाजीयन्स फुटबॉल क्लब , खेड * माजी जिल्हा प्रमुख – भारतीय विद्यार्थी सेना , रत्नागिरी * माजी अध्यक्ष – युवा माहेश्वरी समाज , खेड * माजी अध्यक्ष – गुजर आळी मित्रमंडळ, खेड * विशेष कार्यकारी अधिकारी – (SEO) इ अनेक सन्मानाची पदे क्रीडाक्षेत्र सामाजिक क्षेत्र व शैक्षणिक क्षेत्रात भूषविली आहेत. Deepak Laddha gets Star Education Award
या पुरस्कराबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. Deepak Laddha gets Star Education Award
