• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 December 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिंद्रवले येथील मनोज डाफळे यांना ‘कोकणरत्न’ पुरस्कार

by Guhagar News
December 17, 2025
in Guhagar
117 1
1
Manoj Dafale gets 'Kokanratna' award
229
SHARES
655
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील चिंद्रवले येथील  समाजसेवक रुग्णसेवक श्री. मनोज तानाजी डाफळे यांना उल्लेखनीय वैद्यकीय व सामाजिक सेवेसाठी स्वतंत्र कोकण राज्य अभियान या संस्थेमार्फत ‘कोकणरत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. Manoj Dafale gets ‘Kokanratna’ award

कोरोना महामारीच्या काळापासून सातत्याने वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले श्री. मनोज डाफळे यांनी हजारो रुग्णांना वेळेवर मदत करून अनेकांचे प्राण वाचवले. अतिशय साध्या कुटुंबातून आलेल्या या तरुणाने सन २०२० मध्ये संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीमची स्थापना करून रुग्णसेवेचा वसा हाती घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामार्फत सुमारे २५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली. तसेच काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या वडिलांच्या नावाने एक प्रतिष्ठान सुरू करून वैद्यकीय सेवा व अल्पदरात रुग्णवाहिका सेवा गरीब व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा गुहागर तालुक्यातील सुपुत्र, वरळी येथील माजी नगरसेवक मा. श्री. दत्ता नरवणकर यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. Manoj Dafale gets ‘Kokanratna’ award

Manoj Dafale gets 'Kokanratna' award

कोरोना काळात केलेली निस्वार्थ सेवा तसेच सध्या सुरू असलेले समाजोपयोगी कार्य लक्षात घेऊन श्री. मनोज डाफळे यांना ‘कोकणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या गौरवाबद्दल गुहागर तालुका तसेच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. Manoj Dafale gets ‘Kokanratna’ award

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsManoj Dafale gets 'Kokanratna' awardMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share92SendTweet57
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.