गुहागर, ता. 15 : तालुक्यात खासदार सुनीलजी तटकरे यांच्या कडून मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांना यश आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस यांची तयारी सुरु झाली आहे. NCP accelerates development work

लोकसभा निवडणुकीत कोतळूक कुटांबेवाडी येथील जनतेने खासदार सुनील तटकरे यांना मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. तटकरे साहेब निवडून आल्यानंतर आपला रस्ता होईल, याची खात्री साहिल आरेकर यांनी सचिन ओक यांना दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर कोतळूक कुटांबेवाडी ग्रामस्थांच्या मागणी नुसार खासदार सुनील तटकरे साहेबांच्या निधीतून गुहागर तालुक्यातील कोतळूक कुटांबेवाडी येथील रस्ता मंजूर झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन पार पडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सेक्रेटरी संतोष जोशी, श्रीधर बागकर, सौरभ भागडे, तसेच कोतळूक कुटांबेवाडी मधील महिला भगिनी आणि ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. NCP accelerates development work
