गुहागर, ता. 08 : तालुक्यातील खरे- ढेरे -भोसले महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराचे उद्घाटन तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हे निवासी शिबिर दि. 4 ते 10 डिसेंबर 2025 या दरम्यान जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्र शाळा चिखली क्रमांक 01 या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. Guhagar College Residential Camp

या उद्घाटनाला चिखली सरपंच सौ. मानसी कदम, उपसरपंच सुभाष दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन गमरे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.आंबवकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महेंद्र गायकवाड, कार्यक्रमाधिकारी डॉ. रामेश्वर सोळंके, शाळेचे शिक्षक मुणगेकर, नार्वेकर, सौ. गमरे मॅडम व स्वयंसेवक उपस्थित होते. Guhagar College Residential Camp