लेखक- अनिकेत आ. कोंडाजी, Phd संशोधक, मुंबई विद्यापीठ
गुहागर, ता. 06 : महाराष्ट्र, कोकणाची सागरी सुरक्षा ही नेहमीच, वर्षानुवर्षे संवेदनशील राहिली आहे. ८७७ किमी किलोमीटर असलेली किनारपट्टीचा उपयोग अनेकदा दहशतवादी कारवायांसाठी झाला आहे. या असुरक्षिततेमुळे सागरी सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या आहेत. आणि दहशतवादी धोक्यांचा सामना करण्यासाठी सागरी सुरक्षा यंत्रणा ही कोणताही शत्रू आणि कोणत्याही प्रकारे भेदू शकणार नाही, याकरिता अधिक भक्कम आणि मजबूत करण्याची आवश्यकता आहे. २०२५ च्या सुधारित आकडेवारीनुसार, महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी ८७७.९७ किलोमीटर आहे. यापूर्वी ही लांबी सुमारे ७२० किमी मानली जात होती, परंतु नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या मोजणीमुळे त्यात सुमारे १५८ किमी वाढ झाली आहे. Current status of Konkan’s maritime security
कोकणातील सागरी सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी:
१. रायगडची किनारपट्टी दहशतवादी कारवायांसाठी संवेदनशील राहिली आहे, ज्यामुळे या भागातील सुरक्षा नेहमीच चिंतेचा विषय राहिली आहे.
२. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर किनारपट्टीवर एके ४७ रायफल्स व २५० काडतूसे भरलेली एक बोट वाहत आली होती.
३. अलिकडच्या काळात रत्नागिरी आणि रायगडच्या किनारपट्टीवर अमली पदार्थांची पाकिटे सापडली आहेत.
४. श्रीवर्धनच्या किनार्यावर एका परदेशी बोटीत एके ४७ रायफल सापडल्या आहेत.
५. रत्नागिरीसह रायगडच्या विविध समुद्र किनाऱ्यांवर चरस या अमली पदार्थांची पाकिटे वाहून आली होती. २०९ किलो वजनाची १७५ चरसची पाकिटे मिळून आली आहेत. ज्याची बाजारातील किंमत ८ कोटी ३६ लांखाच्या आसपास होती. परंतु ही पाकिटे कुठून आणि कशी आली हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही.
६. देशातील मोठ्या बंदरांपैकी जेएनपीटी बंदर हे रायगड जिल्ह्यात येते. येथून देश- विदेशातील मालाची वाहतूक होत असते. मात्र, या बंदरातही मागील काही वर्षांत तस्करीच्या घटना उघड झाल्या आहेत.
७. पोलीस यंत्रणा बरोबर शासनाचे मच्छिमार सहकारी सोसायटी, संस्था आणि संघटना मध्ये बांधवांमध्ये नियमित समन्वय नाहीत.
८. मच्छिमार आणि लैंडिंग पॉइंटवर दळणवळण साठी जेट्टी चे अभाव.
९. मच्छिमार बोटीवरील खलाशी रोहिंग्या आणि बांगलादेशी वाढत चालले आहेत.
९. योग्य आणि सत्य माहितीचे संकलन आणि सागरी सुरक्षा विषयी कोळीवाड्यात जनजागृती कार्यक्रम नाहीत.
१०. सागर पोलीस मित्र नियुक्त नाहीत, समन्वय अभाव. Current status of Konkan’s maritime security
या शिवाय किनारपट्टीवर डिझेल चोरी, वाळू उत्खनन, सागरी किल्ले, बेटांवर अतिक्रमण, व्हेल माशांची उल्टीची तस्करी यामुळे कोकणची किनारपट्टीवर कोणत्या अराष्ट्रीय घडामोडी सतत घडत आहेत. या घटनांमुळे सागरी सुरक्षेतील त्रुटी वारंवार समोर आल्या आहेत. पावसाळ्यामध्ये अथवा रात्रीच्या वेळी गस्तीसाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने या काळात सागरी सुरक्षा ही रामभरोसेच असल्याचे आढळून येते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेला अधिक मजबूत करण्याची गरज आहे. Current status of Konkan’s maritime security
कारणे आणि उपाययोजना :
१. नवीन सागरी पोलीस ठाणे निर्मिती व असलेल्या पोलीस ठाण्यांना सागरी पोलीस ठाण्याचा दर्जा द्यावा.
२. सागरी सुरक्षे करिता असलेली पोलीस ठाण्यांतील मनुष्यबल व आवश्यक भरती प्रक्रिया पूर्ण करणे.
३. गस्ती करिता 16 बोटींचे आधूनिकिरण करणे. गस्ती बोट देखभाल व दुरुस्ती वेळेत होऊन, चालकांचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. त्याच प्रकारे शासन निर्णय क्रमांक पीईक्यू/023/प्र.शी 29/पोल-4, दिनांक 14.03.2024 अन्वये, महाराष्ट्र राज्याच्या सागरी सुरक्षा करिता नवीन 20 बोटी खरेदीसाठी रुपये 117.60 कोटी इतकी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. परंतु सदर बाब लक्षात घेता. शासन स्तरावर निर्णय होऊन सुद्धा पूर्ण झाले नाही.
४. ९१ संवेदनशील लँडींग पॉइंटवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळातर्फे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. उर्वरित ५२ ठिकाणी सागरी सुरक्षा तत्काळ नियुक्त करण्यात यावेत.
५. खाडी- किनारी भागात प्रभावी सागरी गतत करण्याकरता (Rigid Inflatable Boat) खरेदीस शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सदर निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
६. सागरी सुरक्षा रक्षकांमार्फत मच्छीमार बोटींना परवाना (टोकण) देण्यात येतो. मात्र ह्या पद्धती मध्ये बदल होणे आवश्यक आहे. अनेक बंदरावर टोकण दिले जात नाहीत, किंवा मच्छिमार सतत उपयोगात आणत नाहीत. या करिता प्रभावी यंत्रणा आणि जनजागृती आवश्यक आहे.
७. सागर कवच प्रभावीपणे नियमित राबविण्यासाठी स्थानिक मच्छिमार नागरिकांबरोबर पोलिसांचे योगदान महत्वाचे आहे. केंद्र आणि राज्य यांचे एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे आहेत.
८. महाराष्ट्र कोस्टल ॲकॅडेमी रायगड आणि रत्नागिरी मध्ये पोलीस वीभागाच्या जागेत करण्यात यावा.
९. सागरी क्षेत्रातील संशयित बोटींचे निरीक्षण आणि अति जलद कार्यवाही साठी आधुनिक तंत्रज्ञान AI युक्त ड्रोनची आवश्यकता ही बंदर अथवा तालुकाशा असल्यास बेकायदेशीर मासेमारी आणि अवैध गोष्टींना वचक बसेल.
१०. महाराष्ट्र: सागरी सुरक्षा धोरणाची प्रभावीपणे अमलबजावणी करीता टास्क फोर्स स्थापन करण्यात यावा.
११. मच्छिमार बोटीवरील व व्यवसायातील रोहिंग्या आणि बांगलादेशी खलाशी यांच्या बरोबर बोट मालक, यांच्या वर कडक कार्यवाही करून सदर बोटींचे परवाना कायम स्वरुपी बंद करावा.
मुंबई सह कोकणची सागरी सुरक्षा ही संवेदनशीलच आहे. उद्या स्फोटके आणि शस्त्रास्त्रही येऊ शकतात. त्यामुळे या घटनांना गांभीर्याने घ्यायला हवे. सुरक्षा यंत्रणामध्ये राहिलेल्या त्रुटींचा अभ्यास करायला हवा. त्या दूर करण्याच्या दृष्टीने तातडीने पाऊले उचलायला हवीत. सागरी पोलिस, तटरक्षक आणि नौसेना, कस्टम्स यांच्यातील समन्वय वाढविणे आवश्यक आहे. भूतकाळातील झालेल्या गोष्टींचा बोध घेऊन वर्तमान आवश्यक सर्व बाबींचे अभ्यासपूर्ण आकलन करून भविष्यातील योजना आखणे हे नागरिकांबरोबर सरकारचे कर्तव्य आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सागरी सुरक्षा भक्कम ठेवणे काळाची गरज आहे. Current status of Konkan’s maritime security
