गुहागर, ता. 21 : Guhagar Nagarpanchayat Election गुहागर नगरपंचायतचीचे नगराध्यक्ष होण्यासाठी आता 4 उमेदवार रिंगणात आहेत. तर 17 प्रभागांमधुन नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी 40 उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मयुरी मुकनाक यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर विविध वार्डमधील 10 उमेदवारांनी नगरसेवक पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. 21 तारखेला सकाळी भाजप आणि शिवसेनेमधील युती (BJP Shivsena Yuti) घोषित झाली. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात उभे केलेले उमेदवार दोन्ही पक्षांनी मागे घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मात्र महायुतीत मिळणाऱ्या जागांवर असमाधान व्यक्त करत नगराध्यक्ष पदासह 5 वार्डमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. Guhagar Nagarpanchayat Election
नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत
नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या मयुरी मयुर मुकनाक यांनी उमेदवारी दाखल केली होती. भाजप शिवसेना युतीमध्ये नगराध्यक्ष पद भाजपकडे गेल्याने मयुरी मुकनाक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. उबाठा शिवसेनेच्या स्नेहा जनार्दन भागडे यांनी उमेदवारी दाखल केली मात्र छाननीपर्यंत एबी फॉर्म सादर करु न शकल्याने त्यांचा अर्ज छाननीमध्येच बाद झाला होता. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी ॲड. सुप्रिया वाघदरे (अपक्ष), पारिजात कांबळे (उबाठा शिवसेना UBT Sena), सुजाता बागकर (राष्ट्रवादी काँग्रेस NCP) आणि निता मालप (BJP) (भाजप शिवसेना युती) अशा चार महिला उमेदवार रिंगणात आहेत. Guhagar Nagarpanchayat Election
प्रभाग क्र. 1 मध्ये तालुकाप्रमुखांची प्रतिष्ठा पणाला
प्रभाग क्र. 1 म्हणजे गुहागर बाग परिसर. या प्रभागातील योगिनी शिरधनकर या भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे येथे तिरंगी लढत होईल. भाजप शिवसेना युतीतर्फे (BJP SENA YUTI) दिपक अमरनाथ कनगुटकर हे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रिंगणात आहेत. यापूर्वी गुहागर नगरपंचायतीमध्ये ते बांधकाम सभापती होते. त्यांच्याबरोबरच समीर बागकर (उबाठा शिवसेना UBT Sena) आणि दिपक शिरधनकर (राष्ट्रवादी काँग्रेस NCP) हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागामधुन सलग दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. सुजाता बागकर निवडून आल्या आहेत. त्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे दिपक कनगुटकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. Guhagar Nagarpanchayat Election
प्रभाग 2 व 3 मध्ये दुरंगी लढत
गुहागर वरचापाट मोहल्ला आणि भंडारवाडा असा परिसर येत असलेल्या या प्रभागातून माजी सरपंच सतिश वासुदेव शेटे हे उबाठा शिवसेनेचे उमेदवार आहेत. तर भाजपचे माजी गटप्रमुख राहीलेले उमेश भोसले (BJP) दुसऱ्यांदा या प्रभागातून निवडणूक लढवित आहेत. शिवसेनेचे राकेश साखरकर यांनी युती झाल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपबरोबर शिवसेनेची देखील या प्रभागात मजबुत बांधणी आहे. त्यामुळे येथील निवडणुकीत उमेश भोसले दुसऱ्यांदा यशस्वी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहीले आहे.
प्रभाग 3 मध्ये उबाठा शिवसेनेच्या रिध्दी घोरपडे आणि मुळ भाजपच्या मात्र हा प्रभाग जागा वाटपात शिवसेनेकडे गेल्याने स्वरा तेलगडे शिवसेनेतून निवडणुक लढवित आहेत. त्यांनी भाजपतर्फे देखील याच प्रभागातून उमेदवारी अर्ज भरला होता. तो आज मागे घेतला.
प्रभाग 4 मध्ये तिरंगी लढत
Guhagar Nagarpanchayat Election Ward 4 या प्रभागातून मनसेच्या (MNS) उमेदवार कोमल जांगळी, भाजपच्या स्मिता जांगळी (BJP SENA YUTI) आणि माजी नगरसेविका नेहा सांगळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत.

प्रभाग 5 मधुन भाजप विजयी
मनसेच्या उमेदवार सिध्दी शेटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या प्रभागातून भाजपच्या सौ. वैशाली मावळंकर बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. ( या प्रभागातील निवडणुकीची बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा,) Guhagar Nagarpanchayat Election
प्रभाग 6, 7, 8 मध्ये दुरंगी लढत
गुहागर बाजारपेठ परिसर असलेल्या या प्रभाग क्र. 6 मध्ये उबाठा शिवसेनेने (UBT SENA) माजी सभापती प्रविण रहाटे यांच्या पत्नी रिध्दी रहाटे यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजप शिवसेना युतीतर्फे भाजपच्या अनुषा भावे (BJP) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दिवाळीनंतर रस्ता रुंदीकरणासाठी बाजारपेठेतील दुकानदारांना आपल्या दुकानांच्या जागा मोकळ्या कराव्या लागल्या. 2019 पासून गुहागर विजापूर महामार्गाच्या कामासाठी या दुकानदारांना जागा रिकाम्या कराव्या लागतील याची चर्चा सुरु होती. याला पर्याय मिळावा म्हणून बाजारपेठेतील अनेक दुकानदारांनी आमदार जाधव यांना समर्थन दिले होते. परंतू यावर्षी भु संपादनाची प्रक्रिया प्रांताधिकाऱ्यांनी पूर्ण केली. दुकानदारांनी स्वत:हून आपल्या दुकानांच्या जागा मोकळ्या करुन दिल्या. मात्र यामुळे नेमके नगरपंचायतीच्या पूर्वीच दुकाने खाली करण्याचे टायमिंग कोणी साधले याची चर्चा सध्या सुरु आहे. त्याचा परिणाम या प्रभागातील निवडणुकीवर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. Guhagar Nagarpanchayat Election
प्रभाग 7 मध्ये गुरववाडी परिसर. या प्रभागात युती झाल्याने विशाखा विकास जाधव या भाजपच्या उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतली. आता उबाठा शिवसेनेच्या प्रगती सुनील वराडकर आणि शिवसेनेच्या (युतीच्या) विदिशा धनंजय दणदणे (Shivsena) निवडणूक रिंगणात आहेत.
प्रभाग 8 मध्ये युतीकडून भाजपच्या सुषमा सुधाकर रहाटे (BJP Shivsena Yuti) आणि उबाठा शिवसेनेकडून रिया संतोष गुहागरकर (UBT SENA) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या प्रभागात तेलीवाडी आणि एसटी बसस्थानकाजवळचा परिसर येतो. Guhagar Nagarpanchayat Election
प्रभाग 9 मध्ये तिरंगी लढत
युतीतर्फे मिरा घाडे (भाजप), उबाठा शिवसेनेतर्फे माजी सभापती वैशाली मालप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शितल कदम (NCP) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. Guhagar Nagarpanchayat Election
प्रभाग 10 मध्ये दिग्गज रिंगणात
गुहागर नगरपंचायतीमधील ही निवडणूक म्हणजे दिग्गजांची निवडणूक ठरणार आहे. गुहागरमधील कवी, ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष, साहित्य व सामाजिक कार्य यामध्ये पुढाकार घेणारे राजेंद्र आरेकर या प्रभागातून उबाठा शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांच्या समोर तगडे आव्हान आहे ते प्रदिप बेंडल यांचे. विधानसभा निवडणुकीतील उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्याचे काम प्रदिप बेंडल यांनी केले आहे. एकेकाळी काँग्रेस (आय)चे तालुकाध्यक्ष पद सांभाळणारे आणि राजेश बेंडल यांच्या प्रत्येक निवडणुकीतील विश्र्वासु सहकारी अशी ओळख असणारे प्रदिप बेंडल स्वत: प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या प्रभागातून भाजपचे शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष नरेश पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेला गेल्यावर नरेश पवार यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. Guhagar Nagarpanchayat Election
प्रभाग 11 प्रविण रहाटेंचे भवितव्य ठरवणार
गुहागर नगरपंचायतीमध्ये सभापती राहीलेले प्रविण रहाटे यावेळी दुसऱ्या प्रभागातून पुन्हा आपले भवितव्य आजमावत आहेत. त्यांचा सामना शिवसेनेचे सुजित साटले यांच्याबरोबर आहे. भाजपचे माजी नगरसेवक मंगेश जोशी यांनी या प्रभागातून आपली उमेदवारी मागे घेतली. Guhagar Nagarpanchayat Election
प्रभाग 12 मध्ये तिरंगी लढत
गुहागर खालचापाट आणि किर्तनवाडीचा काही भाग असा परिसर येत असलेल्या या प्रभागात युतीकडून विशाखा सोमण (भाजप), अन्विता मांडवकर (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि निता गुरव (उबाठा शिवसेना) अशा तिन महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत. Guhagar Nagarpanchayat Election
प्रभाग 13 मध्ये राजु भागडे रिंगणात
किर्तनवाडी परिसर येणाऱ्या या प्रभागात गत निवडणुकीत शहर विकास आघाडीची धुरा सांभाळणारे राजेंद्र अर्जुन भागडे हे (शिवसेना) युतीकडून उमेदवार आहेत. तर उबाठा शिवसेनेकडून सुजल विष्णू होळंब निवडणुक लढवित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष साहील आरेकर हे देखील या प्रभागातून निवडणूक लढवित होते. मात्र त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. तसेच राजु भागडे यांचा मुलगा सौरभ भागडे यांनी देखील अपक्ष म्हणून या प्रभागातून भरलेला अर्ज आज मागे घेतला. त्याचवेळी सौरभ भागडे प्रभाग 14 मधून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या प्रभागात राजेंद्र भागडे यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उबाठा शिवसेनेला पाठींबा देत आहे. अशी चर्चा सध्या गुहागरात सुरू आहे. Guhagar Nagarpanchayat Election

प्रभाग 14 मध्ये तिरंगी लढत
खालचापाट जांगळवाडी परिसरातील या प्रभागात युतीकडून भाजपचे संजय मालप निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर उबाठा शिवसेनेकडून संगिता वराडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सौरभ भागडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग 13 मध्ये वडील राजेंद्र भागडे युतीकडून तर प्रभाग 14 मध्ये मुलगा सौरभ राष्ट्रवादीकडून असे एकाच घरातील बापलेक दोन वेगवेगळ्या पक्षातून उमेदवार असल्याने या बापलेकांच्या उमेदवारीची चर्चा सध्या गुहागरात सुरु आहे. या प्रभागातील अपक्ष उमदेवार रविंद्र ठोंबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
प्रभाग 15 मध्ये दुरंगी लढत
Guhagar Nagarpanchayat Election Ward 15 युतीकडून शिवसेनेचे संदेश उदेक आणि उबाठा शिवसेनेचे अनिकेत जाधव अशी दुरंगी लढत या प्रभागात होणार आहे. भाजप पुरस्कृत प्रज्ञा जांगळी यांनी या प्रभागातील आपली उमेदवारी युतीच्या घोषणेनंतर मागे घेतली आहे.
प्रभाग 16 मध्ये लक्षवेधी निवडणूक
सलग दोन टर्म नगरसेवक राहीलेले अमोल गोयथळे पुन्हा एकदा या प्रभागातून आपले नशिब आजमावत आहेत. उबाठा शिवसेनेतर्फे राज विखारे या सामाजिक कामासाठी तत्पर असणाऱ्या तरुणाला उमेदवारी देण्यात आली आहे. तर मनिष भरत गोयथळे हा तरुण देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे. या तिन्ही उमेदवारांमुळे या प्रभागातील निवडणूक लक्षवेधी झाली आहे. Guhagar Nagarpanchayat Election
प्रभाग 17 मध्ये तिरंगी लढत
या प्रभागातील निवडणुक चुरशीची होणार आहे. युतीतर्फे शिवसेनेच्या सिध्दी आरेकर, उबाठा शिवसेनेतर्फे श्रीया मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे समिक्षा आरेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. Guhagar Nagarpanchayat Election
