जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा
गुहागर, ता. 15 : कोकणातील पर्यटन नकाशावर वेगाने झेपावत असलेल्या गुहागर समुद्रकिनाऱ्याचा दर्जा आणि विकासकामांची गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी गुहागर समुद्र किनाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. ब्ल्यू फ्लॅग मानांकनानंतर किनाऱ्यावर सुरू असलेल्या सुधारणांची अंमलबजावणी, पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधा आणि एकूण व्यवस्थापनाची त्यांनी सखोल तपासणी केली. Development of Guhagar beach accelerated
जिल्हाधिकाऱ्यांसोबत अपर जिल्हाधिकारी भाऊ गळांडे, तहसीलदार परीक्षित पाटील, नगरपालिका मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी ब्ल्यू फ्लॅग निकषांनुसार आवश्यक असलेल्या सर्व घटकांबाबत व आतापर्यंत झालेल्या कामकाजाविषयी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली. Development of Guhagar beach accelerated
जिंदल यांनी समुद्र किनाऱ्या वरील शौचालयांची स्वच्छता, बदलण्याच्या खोल्या, कचराव्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, आपत्कालीन साधने, लाईफगार्ड पथकांची सज्जता व देखरेखी साठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे यांसह सर्व सुविधांची काटेकोर पाहणी केली. “पर्यटकांच्या सुरक्षिततेशी कुठलीही तडजोड चालणार नाही. ब्ल्यू फ्लॅगची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने काम होणे अत्यावश्यक आहे,” असे निर्देश त्यांनी दिले. Development of Guhagar beach accelerated

यावेळी किनाऱ्यावरील सांस्कृतिक उपक्रमांसाठी राखीव जागा, वाहतूक आणि पार्किंगच्या सध्याच्या सोयी, वाढत्या गर्दीचा ताण, स्वच्छतेचे मानदंड आणि पर्यटकांच्या एकूण अनुभवावर परिणाम करणाऱ्या सर्व बाबींचादेखील त्यांनी आढावा घेतला. वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात अतिरिक्त सुविधा उभारण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. Development of Guhagar beach accelerated
जिल्हाधिकाऱ्यांच्या या पाहणीमुळे गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील सुविधांची गुणवत्ता वाढेल, सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत होईल आणि ब्ल्यू फ्लॅग मानांकनाला साजेशी प्रगत पायाभूत व्यवस्था आणखी बळकट होईल, अशी पर्यटन क्षेत्रात अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Development of Guhagar beach accelerated
